टीम इंडियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला दिवस आपल्या नावावर केला. भारताच्या गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट झटके देऊन 159 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या. भारताने यशस्वी जैस्वाल याच्या रुपात एकमेव विकट गमावली. तर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली. टीम इंडिया चांगल्या स्थितीत आहे. आता भारताला आघाडी घेण्यासाठी आणखी 122 धावांची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फंलदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच दिवशी गुंडाळण्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने प्रमुख भूमिका बजावली. एकट्या बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने या दरम्यान पहिल्या सत्रात मोठा विक्रम केला. बुमराह यासह 7 वर्षांत खास कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला. बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला आऊट करत हा खास विक्रम आपल्या नावावर केला.
बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. बुमराहने 2018 पासून ते आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी प्रतिस्पर्धी संघातील सलामी जोडीला एकूण 12 वेळा आऊट केलं होतं. यासह बुमराहने इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र बुमराहने 14 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला आऊट करुन हा खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
बुमराहने रियान रिकेल्टन याला बोल्ड केलं. तर एडन मार्करम याला विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. बुमराहने यासह ब्रॉडच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला.
तसेच अश्विनने रियान रिकेल्टन याला आऊट करण्यासह आणखी एक मोठी कामगिरी केली. रियान बोल्डद्वारे सर्वाधिक विकेट्स मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. बुमराहने याबाबतीत माजी फिरकीपटू आर अश्विन याला मागे टाकलं. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना बोल्ड करण्याची 152 वी वेळ ठरली. तर अश्विनने 151 वेळा फलंदाजांची दांडी गुल केली होती.
अनिल कुंबळे : 186 विकेट्स
कपिल देव : 167 विकेट्स
जसप्रीत बुमराह : 152 विकेट्स
आर अश्विन : 151 विकेट्स