हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या दिवसात गरम स्वभावाचे पदार्थ आपण अधिक प्रमाणात सेवन करतो कारण हे पदार्थ थंडीपासून संरक्षण प्रदान करतात. बरेच लोकं तीळ, सुकामेवा आणि इतर घटक वापरून लाडू आणि इतर पदार्थ तयार करतात. तसेच अनेकदा आहारात गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो. कारण गुळाचा स्वभाव गरम असल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
उसा पासून गुळ तयार होतो हे आपल्याला माहित आहे. पण खजूर आणि ताड यांचा वापर करून देखील गूळ बनवला जातो. खजूरचा गूळ खजूरच्या झाडांच्या गोड रसापासून बनवला जातो. तर या गुळाचा वापर तुम्ही लाडू किंवा इतर मिठाई बनवण्यासाठी करू शकता. या लेखात, आपण गुळ खजुराचा रसगुल्ला कसा बनवला जातो त्याची रेसिपी आपण जाणून घेऊयात.
खजूर गुळाचा रसगुल्ला बनवण्यासाठी चुलीवर दूध गरम करा. गॅस बंद करा आणि गरम दूधात व्हिनेगर मिक्स करा. त्यानंतर दुधाचे पनीर तयार झाल्यावर ते कापडातून किंवा चाळणीतून दुध गाळून घ्या आणि थंड पाण्याने धुवा जेणेकरून व्हिनेगर आणि लिंबाची चव निघून जाईल. मऊ होईपर्यंत हातांनी चांगले मळून घ्या. गरज पडल्यास यात थोडे ताक किंवा दूध मिक्स करून दुधाचे पनीर मळून घ्या. आता यापासून छोटे गोल गोळे तयार करा.
आता तयार गोळे शिजवण्यासाठी खजूराच्या गुळाचे बारीक तुकडे करा. एका भांड्यात बारीक केलेले गुळ टाकुन त्यात 1 ते 2 चमचे पाणी टाकून मंद आचेवर पाक तयार करा. आता तयार पाकात त्यात वेलची मिक्स करा आणि नंतर तयार रसगुल्ले त्यात टाका. आता भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवा. रसगुल्ला फुटू नयेत म्हणून चमच्याने अधूनमधून ढवळत राहा. शिजल्यानंतर, रसगुल्ला पाकात थंड करा. यासाठी तुम्ही ते खोलीच्या तापमानावर साठवू शकता.
खजूरापासून गुळ बनवण्यासाठी पहिले खजूर किसून किंवा रस काढले जाते. नंतर हा रस कमी आचेवर घट्ट केला जातो. हळूहळू खजूराच्या रसमधील पाणी कमी होते, परिणामी जाड, चिकट, गडद तपकिरी गुळ तयार होतो. त्याचा रंग हलका तपकिरी ते गडद तपकिरी असतो. खजूर आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्यापासून बनवलेला गुळ देखील आरोग्यदायी मानला जातो. तथापि त्यात नैसर्गिक साखर असते म्हणून मधुमेह असलेल्या लोकांनी ते सेवन करणे टाळावे. तर या गुळाचा वापर तुम्ही चहा, दूध आणि खीर बनवण्यासाठी देखील करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)