तरीही गिरीजा ओक १०० मतांनी आघाडीवर... प्रिया बापटच्या फोटोवर नेटकऱ्याची खोचक कमेंट; अभिनेत्रीचही चोख प्रत्युत्तर
esakal November 15, 2025 04:45 AM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गिरीजा ओक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या नॅशनल क्रश बनलीये. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमधले कहाणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ही अभिनेत्री कोण आहे याच्या चर्चा सुरु झाल्या. तिचे फोटो देशभरात व्हायरल झाले. ती मराठीसोबतच बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही चर्चेत आहे. मात्र अशातच मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र एका नेटकऱ्याने तिला खालीपणा दाखवण्यासाठी खोचक कमेंट केली. त्यावर आता प्रियाने देखील उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपसृष्टीमध्येही आपली छाप पाडली. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. नुकतेच प्रियाने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. यात ती गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय. या फोटोखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'तरी पन.... गिरीजा ओक गोडबोले १०० मतांनी आघाडीवर.' प्रियाला कमीपणा दाखवण्यासाठी ही कमेंट केली गेली. मात्र यावर प्रियाने असं काही उत्तर दिलं ज्यामुळे त्या नेटकऱ्याची बोलतीच बंद झाली. प्रिया त्याला रिप्लाय करत म्हणाली, '''माझी पण फेव्हरेट आहे ती. कायम!'

PRIYA BAPAT SLAMMS TROLLER

प्रिया आणि गिरिजा या दोघी अनेक वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. या रिप्लायमधून प्रियाने गिरीजा नॅशनल क्रश झाल्याचा आपल्याला आनंदच झालाय असं म्हटलं आहे. तिच्या या यशाचा एक अभिनेत्री म्हणून प्रिया हेवा करत नसल्याचं या कमेंटमधून समजतं. नेटकऱ्याने केलेल्या खोचक कमेंटला प्रियाने चांगलंच उत्तर दिलंय. तर दुसरीकडे गिरीजा नॅशनल क्रश झालीये मात्र त्यासोबतच तिचे काही अश्लील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. जे पाहून गिरिजाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने नाराजी व्यक्त केली. आपला १२ वर्षांचा मुलगा उद्या मोठा होऊन हे सगळं पाहील तेव्हा त्याला काय वाटेल असं ती म्हणालीये.

'फॅमिली मॅन ३'साठी मनोज बाजपेयीने घेतलंय तगडं मानधन; व्हिलनला किती पैसे मिळालेत? प्रियामणीचा आकडाही मोठा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.