फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या आयुष्यात फार संघर्ष राहिला आहे. त्यातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ज्या आज एक लोकप्रिय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी जणू काही त्यांचं आयुष्यच फक्त त्यांच्या कामासाठी आणि अभिनयासाठी वाहिलं असावं एवढ्या त्या त्यांच्या कामासाठी झपाटलेल्या आहेत.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या
उषा नाडकर्णीयांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत. मग ते घरगुती वाद असो किंवा करिअरसाठी घेतलेली मेहनत असो. यासर्वांमधून मार्ग काढत उषा यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, टेलिव्हिजनमध्ये स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे. उषा यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका केल्या आहेत. पण त्यांना हिंदीमध्ये खरी ओळख मिळाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. त्यांना सगळेच आऊ आणि उषाताई म्हणतात.
आई-वडील खूप कडक होते
उषा यांनी भारती सिंग आणि हर्षच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासा केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे पालक त्यांच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते.उषा यांनी सांगितले की त्यांचे आई-वडील खूप कडक होते. वडील तर खूप हिंसक होते. एकदा, जेव्हा तिने तिच्या भावाला मारहाण होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वडिलांनी उषा यांच्यावरच चाकूने हल्ला केला होता.
Usha Nadkarni Untold Struggle
वडिलांनी चाकूने हल्ला का केला होता?
त्या म्हणाली, “आम्हाला आमच्या वडिलांची खूप भीती वाटायची. जर आम्हा भावंडांपैकी एकाला जरी मारहाण झाली तर बाकीचे दोघे पळून जायचे. एकदा, वडील माझ्या भावाला काही कारणास्तव मारत होते आणि मी त्यांना थांबवण्यासाठी गेले. तेव्हा रागात त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि दुसऱ्या दिवशी मी दुखापतीसह कामावर गेले होते.”
आईने घराबाहेर हाकलून लावलं होतं.
पुढे उषा म्हणाल्या जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला अभिनयाबद्दलच्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा आईने त्यांचे सर्व कपडे वैगरे घराबाहेर फेकून दिले आणि त्यांना घराबाहेर हाकलून लावले. त्यांचे वडील त्यांना घ्यायला येईपर्यंत उषाताई एक आठवडाभर त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी राहिल्या होत्या.
या सर्व संघर्षातून उषाताईंनी स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून घडवलं आहे. मराठी असो किंवा हिंदी त्यांचे नाव फार आदराने आणि प्रतिष्ठेने घेतले जाते. त्यांना असंख्य पुरस्कारही मिळाले आहेत.