पथविक्रेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
esakal November 15, 2025 05:45 AM

पिंपरी, ता. १४ ः थेरगाव येथील काळेवाडी रस्त्यावर शनिवारी (ता. ८) महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागाने २०० ते २५० फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. या प्रकरणी पथविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, जप्त केलेला माल परत द्यावा, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी टपरी-पथारी-हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गोरगरीब कष्टकऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात आहे. जप्त माल परत मागणे हक्क आहे. तरीही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.