ओतूर, ता. १६ : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली, अशी माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली. यावेळी विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक दिनेश ताठे यांनी नेहरू यांच्या जीवनपटाबद्दल आणि बालदिनाबद्दल सविस्तर माहिती दिली. सोहम महाकाळ, स्वानंद साठे, मंजिरी मुरादे, शरण्या नलावडे, अनुप्रिया डुंबरे या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे, उपमुख्याध्यापक संजय हिरे, अनिल उकिरडे, भाऊसाहेब खाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष महादेव ओतूरकर, माजी मुख्याध्यापक बबनराव पानसरे, सुरेश गावडे, आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सोनाली माळवे यांनी प्रास्ताविक केले तर अजित डांगे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच देवचंद नेहे यांनी आभार मानले.