गोव्यात गेल्या काही दिवसांपासू राज्याच्या राजाकराणात नोकरी घोटाळा प्रकरण चांगलंच गाजत (Cash-for-Job) आहे. यातच, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने केलेले आरोप आयएएस (IAS) अधिकारी निखिल देसाई यांना चांगलेच भोवले आहेत. पूजा नाईकने आपल्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याबद्दल आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच होणार सुरु!अकासा एअर आणि इंडिगो या दोन प्रमुख विमान कंपन्यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथून नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही थेट जोडणी अत्यंत सोयीची ठरणार आहे.
मोले चेकपोस्टवर पुन्हा बेकायदेशीर गोमांस पकडले, चालक पोलिसांच्या ताब्यातमोले चेकपोस्टवर बेकायदेशीररित्या घेऊन जाणारे गोमांस कारसहीत पोलिस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.