हिवाळ्यात अगदी दररोज बनवू शकता; गाजरच्या या स्वादिष्ट रेसिपी
Webdunia Marathi December 02, 2025 04:45 PM

गाजर हलव्याव्यतिरिक्त गाजरांपासून बनवलेल्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी आज आपण पाहणार आहोत ज्या तुम्ही हिवाळ्यात दररोज बनवू शकता.
गाजर पराठा रेसिपी
साहित्य-
दोन कप- गव्हाचे पीठ
एक कप- किसलेले गाजर
एक चमचा- जिरे
एक - हिरवी मिरची
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तूप किंवा तेल

कृती-
सर्वात आधी एका भांड्यात पीठ घ्या आणि गाजर, हिरव्या मिरच्या, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. तयार पिठाचा पराठा लाटून घ्या व गरम तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा बेक करा. तयार गाजर पराठा दही किंवा लोणच्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.

गाजर सूप रेसिपी
साहित्य-
चार - गाजर
एक- टोमॅटो
एक -आल्याचा छोटा तुकडा
एक चमचा- मिरी पूड
चवीनुसार मीठ
थोडेसे बटर

कृती-
सर्वात आधी चिरलेले गाजर, टोमॅटो आणि आले प्रेशर कुकरमध्ये उकळवा. आता थंड करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. आता एका पॅनमध्ये बटर गरम करा, प्युरी घाला आणि त्यात मीठ आणि मिरपूड घाला. व पाच मिनिटे उकळवा आणि गरम सर्व्ह करा.

गाजर चीला रेसिपी
साहित्य-
एक कप- बेसन
एक कप- किसलेले गाजर
एक- चिरलेला कांदा
एक हिरवी मिरची
कोथिंबीर
चिमूटभर मीठ
पाणी

ALSO READ: A great winter breakfast काही मिनिटांत बनवा कुरकुरीत पालक टिक्की

कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी घालून पीठ तयार करा. आता गाजर, चिरलेला कांदे, मीठ आणि मसाले घाला. व मिश्रण ढवळून घ्या. आता पॅनवर थोडे तेल घाला आणि गोल चीला घाला. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. तयार गरम चिला चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Winter Special Paratha Recipes सौम्य हिवाळ्यात हे स्वादिष्ट पराठे नक्की ट्राय करा

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Winter Special Healthy Drinks हिवाळ्यात हे पाच पेये पिऊ शकता; बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.