दत्त जयंती विशेष नैवेद्य पाककृती घेवड्याची भाजी आणि गव्हाच्या पिठाचा शिरा
Webdunia Marathi December 03, 2025 08:45 PM

दत्त जयंतीसाठी घेवड्याची भाजी आणि गव्हाच्या पिठाचा शिरा हे पारंपारिक आणि विशेष पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात.

ALSO READ: दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

घेवड्याची भाजी
साहित्य-
घेवड्याच्या शेंगा
तेल
मोहरी
जिरे
हिंग
कढीपत्ता
हिरवी मिरची पेस्ट
हळद
मीठ
चिंचेचा कोळ
गूळ
दाण्याचा कूट

कृती-
सर्वात आधी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ करून, धागे काढून बारीक चिरा. आता कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे तडतडल्यावर हिंग, कढीपत्ता घाला. आता हळद आणि मिरची पेस्ट घालून परतून घ्या.
चिरलेला घेवडा आणि मीठ घालून मिसळा.आता चिंचेचा कोळ आणि गूळ घालून, घट्ट झाकण ठेवून वाफेवर शिजवा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी शिंपडा. शेवटी दाण्याचा कूट घाला. चला तर तयार घेवड्याची भाजी, नैवेद्यात ठेवा.

गव्हाच्या पिठाचा शिरा
साहित्य-
एक कप गव्हाचे पीठ
एक कप गूळ
एक कप तूप
पाणी
वेलची पूड
काजूचे काप
मनुका

ALSO READ: दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी पेढा

कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून काजू आणि मनुका तळून घ्या आणि बाजूला काढा.
त्याच पॅनमध्ये उरलेले तूप आणि गव्हाचे पीठ घाला. मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत चांगले भाजा. आता दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात गूळ विरघळवा. भाजलेल्या पिठात गुळाचे पाणी हळूहळू ओता आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि शिरा तूप सोडेपर्यंत शिजवा. आता गॅस बंद करून वेलची पावडर, तळलेले काजू आणि मनुका घालून मिसळा. तयार शिरा नैवेद्यात ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.