IND vs SA: तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? दुपारी 1 वाजताच स्पष्ट होणार!
GH News December 06, 2025 12:10 AM

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याची चाहत्यांना उत्सूकता लागून आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजेता संघ कोण असणार? हे तिसऱ्या सामन्याच्या निकालासह स्पष्ट होईल. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी 6 डिसेंबरला होणार आहे. भारताने या मालिकेत विजयी सुरुवात केली . त्यामुळे भारताला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि भारतावर मात केली. आता तिसऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

या सामन्यातील एक चूकही निर्णायक ठरु शकते. त्यामुळे दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाला एका मुद्द्याबाबत भीती जाणवत आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्काटे यांनी पत्रकार परिषेदला संबोधित केलं. डेस्काटे यांच्या बोलण्यावरुन कुठेतरी टीम इंडियात भीतीचं वातावरण असल्याचं जाणवलं. डेस्काटे यांच्यानुसार, विशाखापट्टणममध्ये दव (Due Factor) निर्णायक ठरणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला तर मालिका गमवावी लागू शकते, याची भीतीही टीम इंडियाला सतावत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला आहे. तसेच तिसऱ्या सामन्यात दुपारी 1 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे मालिका विजेता कोण असणार? हे 1 वाजता निश्चित होईल, असं म्हटलं जात आहे.

टेन डेस्काने काय म्हणाले?

पहिल्या 2 सामन्यांत ड्यू फॅक्टर महत्त्वाचा ठरला. तसेच शनिवारी होणाऱ्या सामन्यातही तसंच होऊ शकतं, अशी भीती रायन टेन डेस्काटे यांनी बोलून दाखवली.

“दव एक मोठा मुद्दा आहे. आता यावर मार्ग शोधायचा ही आमची जबाबदारी आहे. विशाखापट्टणम येथील खेळपट्टी हायस्कोअरिंग आहे. इथे बाउंड्री लहान आहे. मात्र इथे पहिले बॅटिंग येणार की बॉलिंग? हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे”, असं डेस्काटे यांनी नमूद केलं. टीम इंडियाच्या विरोधात सलग गेल्या 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाची धाकधुक आणखी वाढली आहे. अशात आता टीम इंडिया मैदान मारत मालिका जिंकणार की दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा धमाका करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.