>> नीलिमा प्रधान
मेष – विचारपूर्वक बोला
मेषेच्या भाग्येषात मंगळ, चंद्र गुरू लाभयोग. विरोधक मैत्री करतील. तुमच्या मनातील गुपित उघड करू नका. विचारपूर्वक बोला. कायदा पाळा. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. प्रतिष्ठा सांभाळा.
शुभ दिवस. 10, 11
वृषभ – रागावर ताबा ठेवा
वृषभेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. दूरदृष्टिकोन ठेवा.
शुभ दिवस. ७, ९
मिथुन – सावधपणे निर्णय घ्या
मिथुनेच्या सप्तमेषात मंगळ, चंद्र गुरू युती. घरात गैरसमज होतील. दुसर्याचे ऐकून घ्या. नोकरीत सांभाळून व्यक्त व्हा. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल.
शुभ दिवस. ७, ८
कर्क – किचकट प्रश्न सोडवाल
कर्केच्या षष्ठेशात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने किचकट प्रश्न सोडवाल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वाहोईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल.
शुभ दिवस. १२, १३
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सिंहेच्या पंचमेषात मंगळ, चंद्र गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. अहंकाराची भाषा दूर ठेवा. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिका होईल. महत्त्वाची चर्चा गुप्त ठेवा.
शुभ दिवस. १२, १३
कन्या – कार्याचा वेग वाढवा
कन्येच्या सुखेषात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोण योग. प्रवासात वाद जाणवेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. गोड बोलून कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक अडचणी येतील. लोकप्रियता वाकार्याचा वेग वाढवा.
शुभ दिवस. ७, ८
तूळ – वादाचा प्रसंग टाळा
तुळेच्या पराक्रमात मंगळ, चंद्र गुरू युती. वादाचा प्रसंग टाळून महत्त्वाची कामे पूर्ण करा. नोकरीत मैत्री वाढेल. कामात प्रगती होईल. धंद्यात सतर्क रहा. कला, क्रिडा क्षेत्रात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद काम होईल.
शुभ दिवस. ७, ९
वृश्चिक – नोकरीत स्पर्धा वाढेल
वृश्चिकेच्या धनेषात मंगळ, बुध नेपच्यून त्रिकोणयोग. सर्वत्र सावधपणे बोला. अचानक खर्च निर्माण होतील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीत स्पर्धा वाडोळ्यांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तर्कशुद्ध वागा.
शुभ दिवस. 8, 11
धनु – संयम बाळगून व्यक्त व्हा
स्वराशीत मंगळ, चंद्र गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीला अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या. धोका पत्करू नका. संयमाने बोला. प्रतिष्ठा धोक्यात येण्याची फसगत होण्याची शक्यता. राजकीय क्षेत्रात डावपेच खेळावे लागतील.
शुभ दिवस. 11, 12
मकर-चौफर यांची उपस्थिती होती
मकरेच्या व्ययेषात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोण योग. काम करताना चूक होणार नाही याकडे लक्ष द्या. प्रवासात वाद टाळा. नोकरीत दगदग होईल. सप्ताहाच्या मध्यावर मनस्ताप होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा.
शुभ दिवस. 8, 13
कुंभ – विचारपूर्वक गुंतवणूक करा
कुंभेच्या एकादशात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. क्षुल्लक अडचणींवर मात कराल. गुप्त कारवाया वानोकरीत वरिष्ठांची कामे करावी लागतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गजांचा परिचय होईल.
शुभ दिवस. 7, 11
मीन – कामाचे कौतुक होईल
मीनेच्या दशमेषात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोण योग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. नोकरीत बची शक्यता. कामाचे कौतुक होईल. वाद वानका. प्रेरणादायक कालावधी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियत वाढेल.
शुभ दिवस. 8, 13