Sangli News : सांगलीत सतत पावसाला सामोरे जात शेतकऱ्यांनी ३३,३१० हेक्टर ऊस लागवड पूर्ण केली
esakal December 07, 2025 01:45 PM

सांगली : यंदा सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस लागवडीला मोठे अडथळे निर्माण झाले. शेतशिवारात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने लागवडीत विस्कळीतपणा आला, तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचा वेग टिकवून ठेवत मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर लागवड पूर्ण केली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तब्बल ३३ हजार ३१० हेक्टर ऊस लागवड पूर्ण झाली असून त्यातील २५ हजार ४४७ हेक्टर क्षेत्र ‘आडसाली’ लागवडीचे आहे. पुढील १५ दिवसांत ‘सुरू’ लागवड सुरू होणार असून ती किती प्रमाणात होईल, याकडे कृषी विभागाचे लक्ष आहे.

Sangli News : सांगलीत गळीत हंगामाला वेग! १५ कारखाने सुरू; तब्बल १२.९७ लाख टन उसाचे गाळप, क्रांती कारखाना सर्वांत पुढे

दुष्काळी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्यांमध्येही यंदा मुबलक पाऊस आणि सिंचन योजनांचे पाणी उपलब्ध झाल्याने ‘सुरू’ व ‘पूर्वहंगामी’ ऊस लागवड वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांना सध्या पुरेसा ऊस उपलब्ध असून पुढील वर्षी ऊस लागवड क्षेत्रात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अनेक साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने यंदाचा गळीत हंगाम १२० ते १३० दिवस चालण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कारखान्यांची मनमानी ! 'साेलापूर जिल्ह्यात असंघटित शेतकरी हतबल'; दरात तफावत, उत्तर, दक्षिण, अक्कलकोटमध्ये चुप्पी !

यंदाच्या हंगामात १२ मेपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२५ अखेर १०९ टक्के पाऊस झाल्याने काही ठिकाणी लागवड उशिरा झाली. पूर हंगामातील ऊस लागवड सामान्यतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते; मात्र अतिवृष्टीमुळे या हंगामातही लागवडीत विलंब झाला. सध्या ‘आडसाली’ आणि ‘पूर्वहंगामी’ लागवड जवळपास पूर्णत्वास आली असून ‘सुरू’ हंगामातील लागवड पुढील पंधरवड्यात सुरू होणार आहे. शेतकरी तयारीला लागले आहेत. ऊस लागवड क्षेत्रनिहाय तपशील (हेक्टरमध्ये)

आडसाली : २५,४४७

पूर्वहंगामी : ५,६६२

सुरू : पुढील १५ दिवसांत सुरू

खोडवा : २,२०१

तालुकानिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

मिरज २,४७४

जत  २,४०२

खानापूर ४,७८१

वाळवा ५,१३६

तासगाव २,३४३

शिराळा १,१३०

आटपाडी ९८५

कवठेमहांकाळ १,०३७

पलूस ६५३

कडेगाव ८,३८९

एकूण ३३,३१०

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.