-अमोल बनकर
शाहूनगर : मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला हा मानबिंदू आहे. या किल्ल्याला जोडणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. हा किल्ला पालिका हद्दीत आल्यानंतर त्याचे संवर्धन करण्याच्या निर्णयानुसार, तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण आता पूर्णत्वाकडे गेले आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचीही चांगली सोय झाली आहे.
Pune News: दुर्देवी घटना ! 'हुबळीनजिक अपघातात बारामतीतील दांपत्याचा मृत्यू; देवदर्शनाहून येताना काळाचा घालाकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेने पर्यटकांना जास्तीचा त्रास सहन करावा लागत होता; परंतु पालिका हद्दीत आल्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्याचे संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले होते. रस्त्याच्या कामाचे दोन टप्पे करत त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले होते; परंतु मंगळाई मंदिर ते चारभिंत मुख्य रस्ता या मार्गाचे काम रखडले होते. हे काम पालिकेने हाती घेत नुकतेच पूर्ण केले.
यामुळे किल्ल्याकडे जाणाऱ्या तीन किलोमीटरचा पूर्ण रस्ता काँक्रिटचा झाला आहे. रस्ता काँक्रिटीकरण झाल्यामुळे किल्ल्यावर ये- जा करणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची मोठी सोय झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची होणारी दुरवस्था या कामामुळे थांबणार आहे. आता वाहनधारक आणि पादचाऱ्यांना किल्ल्यावर जाणे सुकर झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
गुणवत्तापूर्ण कामाचा प्रयत्नसाताऱ्याचा मानबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून, त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामावर पालिकेच्या बांधकाम विभागाचे जास्तीचे लक्ष होते. संपूर्ण काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी सातत्याने त्याठिकाणी होणाऱ्या कामांची तपासणी करत होते. त्यांच्या योगदानामुळे हे काम दर्जेदार होण्यास मदत झाली.
इतर कामांचाही आराखडाकिल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंचे संगोपन, संवर्धन, तटबंदी आणि प्रवेशद्वाराचे जतन करण्यासह इतर कामांचा आराखडा देखील पालिकेने तयार केला असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. यानुसार या कामासाठी ११२ कोटींचा निधी आवश्यक आहे.
दोन कोटींचा निधी खर्चमंगळाई मंदिर ते किल्ला पायथा हा रस्ता सुमारे दीड किलोमीटर अंतराचा आहे. ते काम दुसऱ्या टप्प्पात पालिकेने हाती घेतले. जुन्या रस्त्याची खुदाई करत आवश्यक त्याठिकाणी भर घालण्याचे काम पहिल्यांदा झाले. त्यानंतर डोंगरातील पाणी वाहून नेण्यासाठी गटारनिर्मिती करत एक मार्गिका व नंतर दुसरी मार्गिका अशा पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी सुमारे दोन कोटींचा निधी पालिकेमार्फत खर्च करण्यात आला आहे.
Success Story:'सायगावच्या पृथ्वीराजची भारतीय वायुसेनेत भरारी'; जिद्दीच्या जाेरावर देशात ५१वी रँक, 'जावळी'च्या शिरपेचात मानाचा तुरा ! असे होते दोन टप्पेपहिला टप्पा : अजिंक्यतारा किल्ला प्रवेशद्वार ते मंगळाई मंदिर वळणापर्यंतचा रस्ता.
दुसरा टप्पा : अजिंक्यतारा किल्ला पायथा ते मंगळाई मंदिर वळण अखेरचा रस्ता.