वडगाव मावळ, ता. ७ : आंदर मावळातील शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.
पुण्यातील केशवनगर येथील नारायण सुराले, रेणुका गायकवाड, अनुराधा हरिहर या दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर दिले. यामुळे विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांस प्राप्त झालेले स्वेटर हे उत्तम दर्जाचे असून समाजास अशा दानशूर व्यक्तींची आवश्यकता आहे असे मत मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी व्यक्त केले. स्वेटर वाटपास शिक्षक उमेश माळी व राजू वाडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.