इंडिगोच्या उड्डाण रद्द करण्यावर काँग्रेस नेते पवन खेरा म्हणतात, "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?... या वर्षी, अमिताभ कांत इंडिगोच्या संचालक मंडळात सामील झाले आणि कंपनीने ५० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले?..."
Nanded liveupdate: -जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात लागली आगनांदेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात आज अचानक आग लागली. आग वेळेत नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत यूपीएससह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याने नुकसान झाले असून, विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
LiveUpdate News: महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवातबैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत,अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित
Pune Live : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणउत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या वडगाव परिसरात बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर वाढला आहे. वडगाव येथील एका घरासमोरील CCTV कॅमेऱ्यात सकाळच्या वेळेत बिबट्या रस्त्यावरून जाताना स्पष्टपणे दिसून आला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्यांना तातडीने पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दिवसा अशा प्रकारे बिबटे फिरू लागल्यास घराबाहेर जाणेही कठीण होणार असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
गोरेगाव आरे कॉलनी परिसरात भरधाव दुचाकीने बेस्ट बसला समोरून जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विले पार्ले येथील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मुलुंड ते गोराई मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बस क्रमांक 460 ला या अपघातात मोठे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने परिसरात काही वेळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.
आरे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai Live : डोंबिवलीतील धक्कादायक खून! जेवण सांडल्याच्या वादातून मजुराची हत्याडोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. दीनदयाल रोडवरील एका बांधकाम साईटवर जेवण सांडल्याच्या किरकोळ कारणावरून दोन मजुरांमध्ये वाद झाला. रात्री सर्व मजूर झोपले असताना, संतापलेल्या जयसान मांझी यांनी बांबूने मारहाण करून सहकारी मजूर गौरव जगत याची हत्या केली. घटनेनंतर विष्णूनगर पोलिसांनी आरोपी जयसान मांझी याला अटक केली असून दोघेही मूळचे ओडिशा येथील आहेत. या प्रकरणामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
विदर्भाच्या मुद्द्यावर वडेट्टीवार आक्रमक; विदर्भवादी नेत्यांची नागपुरात निवासस्थानी भेटविदर्भासाठी वेगाने आणि ठाम भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थानी विदर्भवादी नेत्यांनी भेट देत त्यांचे जाहीर स्वागत केले. विदर्भाच्या विकास, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या भेटीला विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते वामनराव चटप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विदर्भाच्या मुद्द्यावर नव्याने हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे.
पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा; ई-केवायसी व निकषांमुळे 2,588 शेतकरी लाभाबाहेरकेंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नुकताच धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, 20व्या हप्त्यानंतर लागू करण्यात आलेल्या अधिक काटेकोर नियमांमुळे जिल्ह्यातील तब्बल 2,588 शेतकरी अपात्र ठरले आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे, तसेच एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी लाभ घेतल्याची नोंद आढळल्यामुळे ही कपात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत एकूण 6 हजार रुपये दिले जातात, मात्र नव्या निकषांमुळे लाभार्थींची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.
Nagpur Live: हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये थंडीचा जोरहिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात जमलेली राजकीय गर्दी एकीकडे जमीन घोटाळा, कर्जमाफी, महिला अत्याचार आणि कुंभमेळ्यासाठी झालेल्या वृक्षतोडीवर तापलेली चर्चा अनुभवत असतानाच दुसरीकडे शहरावर मात्र थंडीचा जोर वाढत आहे. यंदा नागपूरचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी खाली राहण्याचा अंदाज असून रविवारी किमान तापमान 8.5°C नोंदवले गेले आहे, तर पुढील आठवड्यात ते आणखी २°C नी घसरण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उपराजधानीला जणू हिल-स्टेशनचा अनुभव येत असून, २०१८ मध्ये डिसेंबरमध्ये नोंदलेल्या 3.5°C च्या विक्रमाची आठवण होत आहे; यंदाही नागपूर-विदर्भात थंडीची तीव्रता वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
Murlidhar Mohol Live : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळइंडिगोतील गोंधळामुळे देशातील विमानसेवा ठप्प झाली. कंपनीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दोषी व्यक्तींना सोडले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
Goa Live : गोव्यातील नाईटक्लब अग्निकांडातील मृतांचा आकडा वाढलागोव्यातील नाईट क्लब मधील भीषण आगीतील मृतांचा आकडा आता २५ झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
Pune Live : अंगावर भिंत पडल्याने कामगारांचा मृत्यूअंगावर शेड आणि भिंत पडून एका निष्काप कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील J ब्लॉक येथील प्लॉट नंबर 485 या ठिकाणी काल संध्याकाळ दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मारुती भालेवार भालेराव वय अंदाजे 30 ते 35 वर्षे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Dharashiv Live : पीएम किसान सन्मान योजनेतून धाराशिव जिल्ह्यातील 2588 शेतकरी वगळलेकेंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो माञ 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपाञ ठरले आहेत.
Nagpur Live : अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्दइंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका बसला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली.
Nanded Crime : सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडीनांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. 27 नोव्हेंबरला सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटेच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह दोन भावांना अटक केली होती. आतापर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटकेत आहेत. नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Pune Airport : पुणे विमानतळावरून 69 विमानाची उड्डाणे रद्दपुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाची उड्डाणे रद्द केली. सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा फटका बसला. पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले. इंडिगोचे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द झाली.
Kolhapur News : गर्भलिंग निदानप्रकरणी दोन एजंटांना अटक, करवीर पोलिसांची कारवाईकोल्हापूर : बालिंगा येथील गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन एजंटांना अटक केली. नितीन बळवंत किल्लेदार (वय ३५, रा. कंदलगाव, ता. करवीर) आणि विक्रम वसंत चव्हाण (३९, रा. संतमळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. करवीर पोलिसांनी ही कारवाई केली.
Nipani Crime : इचलकरंजीतील युवकाचा निपाणीजवळ खून; मृतदेह टाकला ओढ्यातनिपाणी : इचलकरंजी येथील युवकाचा निपाणीजवळील महाराष्ट्र हद्दीत अर्जुननगर (ता. कागल) येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस ओढ्यामध्ये खून झालेला मृतदेह आढळून आला. शनिवारी (ता. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली. सुहास थोरात (वय २१ रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिमंडळ आज उपराजधानीत होणार दाखल; अतिवृष्टी, आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारला घेरणारनागपूर : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने रवीभवन, नागभवन परिसरात तसेच आमदार निवासस्थान परिसरात वर्दळ वाढली आहे. नागभवन आणि रवी भवन मंत्र्यांचे बंगले, निवासस्थाने, तसेच विविध विभागांची तात्पुरती कार्यालये सज्ज करण्यात आली आहेत. रविवारी संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार आणि शासकीय यंत्रणा नागपुरात दाखल होणार असल्याने शहरात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची कोंडी टाळण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री आजच (ता.७) दाखल होणार आहेत.
Goa Nightclub Fire Tragedy : गोव्यातील नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 23 जणांचा मृत्यूLatest Marathi Live Updates 07 December 2025 : गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये रविवारी पहाटे (7 डिसेंबर) लागलेल्या आगीमध्ये कमीतकमी 23 जणांचा मृत्यू झाला. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा पोलिसांना संशय आहे. नॉर्थ गोव्यातील अर्पोरा भागात असलेल्या क्लबमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही पर्यटकांचाही समावेश आहे. तसेच ‘इंडिगो’ कंपनीचा हवाई वाहतूक गोंधळ वाढल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप केला आहे. विमानसेवा रद्द झाल्यामुळे त्रासलेल्या सर्व प्रवाशांना कंपनीने प्रवासभाडे रविवारपर्यंत (ता.७) परत करावे, असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासह उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. १ ते ४ जानेवारी या कालावधीत साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री आजच (ता.७) दाखल होणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..