मोठा स्फोट… हादरला संपूर्ण परिसर… लोकांची पळापळ… अनेकांचा मृत्यू, भीषण आगीत सर्वकाही उद्ध्वस्त
Tv9 Marathi December 07, 2025 05:45 PM

सर्वकाही सुरळीत नेहमीप्रमाणे सुरु असताना परिसरातील एका नागरिकाला मोठ्या स्फोटाचा आवज येतो आणि क्षणात आगीच्या ज्वाळा भडकताना दिसतात… ज्यामुळे परिसरातील खळबळ माजली आणिआगीत अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत…. ही दुर्दैवी घटना गोवा येथील उत्तरेला असलेल्या अर्पोरा भागातील Birch by Romeo Lane नावाच्या एक नाईट क्लब घडली आहे. नाईटक्लबमध्ये आग लागल्याने गोंधळ उडाला, त्यामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि नागरिकांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. जवळच्या एका रेस्टॉरंटमधील सुरक्षा रक्षकाने सांगितले की घटनेच्या काही क्षण आधीपर्यंत सर्व काही सामान्य होतं.

सर्वकाही सामान्य असताना अचानक स्फोट झाला ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला… सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील गाडीचा टायर फुटला असेल असं वाटलं.. पण आवाज इतका मोठा झाला की, आम्ही बाहेरच्या दिशेने पळू लागलो… त्यानंतर कळलं की सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणात सर्वकाही उद्ध्वस्त झालं…

एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मी घरी जात असताना अचानक एक मोठा स्फोट ऐकू आला. काही मिनिटांनंतर, आम्हाला रुग्णवाहिका घटनास्थळी धावताना दिसल्या. आम्ही पोहोचलो तेव्हा आग इतकी पसरली होती की आत जाणं देखील कठीण झालं होतं. तेव्हा बचाव कार्य सुरु झालं होतं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर क्लबच्या आतून ओरडण्याचं आवाज येऊ लागले. परिस्थिती धोकादायक असताना परिसरातील लोक तात्काळ मदतीसाठी धावले. पण भीषण आग लागल्यामुळे बचाव पथकांनागी आत पोहोचण्यास अडचण येत होती..

भीषण आगीत 23 लोकांचं निधन

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली, ज्यामध्ये 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी आहेत. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली असल्याचं तपासात समोर आलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितल्यानुसार, 23 लोकांचं निधन झालं.

ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. गोवा सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना अटक करेल. गोव्याच्या पर्यटन इतिहासातील ही एक धक्कादायक घटना आहे… असं देखील प्रमोद सावंत म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.