नागपूर : मासिक पाळी म्हटली की महिलांना शारिरीक व मानसिक अशा दोन्ही स्तरावर त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता अंबाडीचे फुल हे महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. अनेक महिलांना मासिक पाळीतील अनियमितता, पोटदुखी, थकवा तसेच वाढते वजन यांसारख्या समस्या भेडसावत असतात.
अशा महिलांसाठी अंबाडीच्या फुलांचा नियमित आहारात समावेश हे अतिशय फायद्याचे ठरत आहे. पचन सुधारण्यापासून ते हार्मोन्सचे संतुलन राखण्यापर्यंत अंबाडीचे फूल आरोग्याला मदत करते. या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम व फायबर असते.
Indigo Flight Controversy: Nagpur हून Pune ला निघाले, Hyderabad ला पोहचले | Sakal Newsत्यामुळे, मासिक पाळीदरम्यान होणारी सूज, थकवा, रक्तक्षयाची लक्षणे कमी होतात. त्यातील नैसर्गिक गुणधर्म शरीरातील दाह कमी करून पोटदुखीतही आराम देतात. अंबाडीच्या फुलाची भाजी, कढी, सूप, चहा किंवा कोशिंबिर बनवून खातात. ग्रामीण भागात पारंपरिक औषधी म्हणूनही याचा उपयोग केला जातो. पचनक्रिया सुधारल्याने अन्नाचे शोषण नीट होते आणि वजन अनियंत्रित वाढण्याची शक्यता कमी होते.
महिलांनी दर आठवड्यात किमान एकदा अंबाडीची फुले आहारात समाविष्ट केल्यास मासिक पाळीतील त्रास कमी होण्यास, रक्तवर्धन होण्यास आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत होते. नैसर्गिक, पौष्टिक आणि सहज उपलब्ध असल्याने अंबाडीची फुले महिलांच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने औषधी ठरत आहेत.
अंबाडीच्या फुलांचे इतरही फायदे
१.अंबाडीच्या फुलांमुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.
२.अंबाडीची फुले आयर्न, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सनी भरलेली असतात.
३. या फुलांनी रक्तातील हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत होते.
४.पचनक्रिया सुधारते, त्वचा व केसांसाठी उपयुक्त असतात.
५.रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते, तणाव कमी करण्यास मदत.
६.वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात.
अंबाडीच्या फुलांमध्ये अॅंटिऑक्सिडंट्स असतात. ती शरीराला गारपणा देतात. ज्या महिलांना पीसीओएस किंवा पीसीओडीची समस्या आहे त्यांनी या फुलांचे सेवन केल्याने आराम मिळतो. त्याशिवाय, पचनासाठी उत्तम, हार्मोन्स संतुलीत ठेवतात तसेच, शरीरात उर्जा व पोषण मिळते, असे आहारतज्ज्ञ डॉ. निता हरदास यांनी सांगितले.