Karad News: माेठी बातमी ! 'राजेंद्र यादव समर्थकांकडून नगराध्यक्षपदाची पाटी'; कऱ्हाड पालिकेच्या निकालापूर्वीच यशाच्या खात्रीची चर्चा !
esakal December 07, 2025 06:45 PM

कऱ्हाड : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे राजेंद्र यादव हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीचा निकाल (ता. २१) ला जाहीर होणार असताना यादवांच्या समर्थकांनी नगराध्यक्षपदाची पाटी तयार केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि लोकशाही-यशवंत विकास आघाडी अशी प्रमुख लढत झाली. यामध्ये लोकशाही-यशवंत आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र यादव निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. दरम्यान, शहरातील १५ (ब) प्रभागातील मतदान (ता. २०) रोजी होणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला सर्व मतदानाची एकत्रित मोजणी होणार आहे.

त्याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. तत्पूर्वीच राजेंद्र यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पाटी तयार केली, तसेच ती त्यांच्या कार्यालयात काही काळ ठेवली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.