हिवाळ्यात थंडाव्यामुळे बरेचजण त्यांच्या मुलांचे केस दररोज धुत नाहीत, कारण थंडीच्या दिवसात लहान मुलांना थंडाव्यामुळे लगेच सर्दी होण्याची शक्यता असते. कारण लहान मुलांची त्वचाही खुप नाजूक असते. त्यामुळे केस धुण्याची योग्य पद्धत केसांचा प्रकार, हवामान आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. चला तर मग आजच्या लेखात आपण लहान मुलांचे केस आठवड्यातून किती वेळा धुवावेत याबद्दल तज्ज्ञांकडून अधिक जाणून घेऊयात.
मुलांचे केस किती वेळा धुवावेत?
दररोज केस धुण्याची गरज नाही. लहान मुलांचे केस प्रौढांइतके लवकर तेलकट होत नाहीत, म्हणून वारंवार केस धुण्यामुळे त्यांच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते. यामुळे लहान मुलांच्या स्कॅल्प कोरडे पडू शकते आणि खाज सुटू शकते.
नवजात बाळ असेल तर त्याचे केस पहिले 4-6 आठवडे शाम्पू टाळा. फक्त पाण्याने हळूवारपणे स्वच्छ करा.
6 आठवड्यांपेक्षा जास्त वयाची असलेल्या लहान मुलांची आठवड्यातून 1-3 वेळा सौम्य बेबी शाम्पूने केस धुवा.
ज्यामुलांचे वय 8 ते 12 वर्ष आहे त्यांनी आठवड्यातून 2-3 वेळा केस धुणे पुरेसे आहे.
12 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांनी केसांची स्थिती आणि तेलकटपणा जास्त जाणवल्यास केस धुवावे.
दररोज केस धुणे हानिकारक का आहे?
वारंवार केस धुण्यामुळे स्कॅल्पमधील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होऊ शकतात. तसेच केस तुटणे आणि केस गळणे अशी समस्या वाढू शकते. संवेदनशील टाळूवर वारंवार शॅम्पू केल्याने संसर्ग किंवा जळजळ होऊ शकते.
हवामान आणि केसांचा प्रकार विचारात घ्या
उन्हाळ्याच दिवसात मुलांना खूप घाम येत असेल किंवा तो बाहेर खेळत असेल, तर तुम्ही केस रोज धुवू शकता.
हिवाळ्यात वारंवार केस धुणे टाळा, कारण यामुळे सर्दी होण्याचा आणि स्कॅल्प कोरडी होण्याचा धोका वाढतो.
तेलकट स्कॅल्पची समस्या असलेल्या मुलांना त्यांचे केस थोडे जास्त वेळा धुवावे लागू शकतात.
कोरडे किंवा कुरळे केस असलेल्या मुलांना ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून कमी वेळा धुवावे.
केस धुताना घ्यावयाची काळजी:
सौम्य बेबी शाम्पू वापरा.
केसांचे शाम्पू राहणार नाही याची खात्री करून केस पूर्णपणे धुवा.
केस धुताना खूप गरम पाणी वापरणे टाळा. तर कोमट पाणी वापरणे चांगले.
केस धुतल्यानंतर ब्लो ड्रायरने केस हलक्या हाताने वाळवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)