भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आपल्या मजेशीर व्हिडीओसाठी ओळखला जातो. सामन्यानंतर सहकाऱ्यांसोबत मजा–मस्करी करणं ही त्याची खास शैली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरही असंच काहीसं घडलं आहे. यावेळी अर्शदीपने विराट कोहलीबरोबर व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विराटने त्याला मजेशीर उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून अर्शदीपची बोलतीच बंद झाली. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २७० धावांत गुंडाळलं. इतकच नाही, तर फलंदाजांनी अवघ्या ३९ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केलं. विशेष म्हणजे यावेळी धावा कमी असल्याने विराट कोहलीचं सलग तिसरं शतक थोडक्यात हुकलं.
Video Viral: तिसऱ्या वनडेतील विजयानंतर विराटने रोहितला मारली मिठी, पण गंभीरसोबत...; मॅचनंतर हँडशेकवेळी नेमकं काय झालं?View this post on Instagram
यावर सामाना संपल्यानंतर अर्शदीपने विराटची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्याने याचा व्हिडीओ देखील बनवला. या सामन्यात धावा कमी पडल्या नाही, आणखी एक शतक नक्कीच झालं असतं, असं अर्शदीप म्हणाला. यावर विराटनेही मजेशीर उत्तर दिलं. आपण टॉस जिंकलो ते बरं झालं नाही, तुझंही शतक पूर्ण झालं असतं, असं मजेशीर उत्तर त्याने दिलं. त्यावर अर्शदीपची बोलतीच बंद झाली.
Ruturaj Gaikwad: विराटने कशी मदत केली? चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काय विचार केला, ऋतुराजने सर्वच सांगून टाकलंView this post on Instagram
मुळात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी ३५९ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, तरीही या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. हे लक्ष्य आफ्रिकेच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं होतं. या सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी अर्शदीपसह भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्यावरून विराटने अर्शदीपला हा टोला लगावला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.