FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाची सलामी अल्जेरियाविरुद्ध; विश्वकरंडक फुटबॉल ड्रॉ, ११ जून ते १९ जुलै स्पर्धेचा कालावधी
esakal December 08, 2025 06:45 AM

वॉशिंग्टन : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ भव्यदिव्य कार्यक्रमातून निश्चित करण्यात आला. त्यानुसार गतविजेत्या लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघाची सलामी अल्जेरिया संघाविरुद्ध होणार आहे.

भूतलावर सर्वाधिक लोकप्रिया असलेल्या फुटबॉल खेळाची ही विश्वकरंडक स्पर्धा ११ जून २०२६ पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे संयुक्तपणे होणार आहे. यंदा प्रथम पात्र ठरणाऱ्या संघाची संख्या ४८ असणार आहे. एकूण १०४ सामने होणार आहेत. ड्रॉ निश्चित करण्याच्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

मेस्सी या स्पर्धेत खेळणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. या स्पर्धेच्या वेळी मेस्सीचे वय ३९ वर्षे असणार आहे. मेस्सी सहभागी झाला आणि त्याचप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याही संघाने गटसाखळीतून अपेक्षित असलेला पुढच्या फेरीत प्रवेश केला तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा मुकाबला होण्याची शक्यता आहे.

आमच्या दृष्टीने सर्वकाही नियोजनाप्रमाणे आणि सुरळीत सुरू आहे, या स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी खेळायचे की नाही, या मेस्सीच्या निर्णयाची आम्हीही वाट पाहत आहोत, असे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कोलोनी यांनी सांगितले.

यजमान अमेरिकेची समावेश ड गटात झाला आहे. १९३० मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिकेच्या संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर २००२ मधील स्पर्धेत ते उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले होते.

T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

यंदा त्याची सलामी कॅलिफोर्निया येथे १२ जून रोजी पॅराग्वे संघाविरुद्ध होणार आहे. स्पर्धेचे आणखी एक सहयजमान असलेल्या मेक्सिकोचा सलामीचा सामना मेक्सिको सिटी येथे ११ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ४८ पैकी ४२ संघ पात्र ठरले आहेत. उर्वरित सहा जागांसाठी २२ संघ प्लेऑफमध्ये खेळत आहे. हे संघ ३१ मार्च रोजी निश्चित होतील.

दृष्टिक्षेपात

  • ४८ देशांची स्पर्धा ः ११ जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे मिळून १०४ सामने

  • अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी अल्जेरियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार

  • ४८ देशांची स्पर्धा ः ११ जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे १०४ सामने

  • कुरासाओची ऐतिहासिक मजल ः १.५ लाख लोकसंख्येच्या कुरासाओचा जर्मनीविरुद्ध उद्घाटन सामना

  • अर्जेंटिनाचे सामने ः अल्जेरिया, ऑस्ट्रिया आणि जॉर्डन (ज गट)

  • मेस्सीचा सहाव्या विश्वचषकात सहभाग अद्याप निश्चित नाही

  • ४२ संघ निश्चित; २२ संघ प्लेऑफमध्ये, उर्वरित सहा जागा ३१ मार्चला निश्चित

  • नवा फॉरमॅट ः १२ गट, विजेते/उपविजेते + ८ तिसऱ्या क्रमांकाचे संघ एकूण ३२ संघ पुढच्या फेरीत

गटवारी

  • ए ः मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, प्लेऑफ ड मधील विजेता संघ

  • बी ः कॅनडा, प्लेऑफ अ मधील विजेता, कतार, स्वित्झर्लंड

  • सी ः ब्राझील, मरोक्को, हैती, स्कॉटलंड

  • डी ः अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, प्लेऑफ क मधील विजेता

  • ई ः जर्मनी-कुरासाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर

  • एफ ः नेदरलँड्स, जपान, प्लेऑफ ब मधील विजेता टुनिशिया

  • जी ः बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड

  • एच ः स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे

  • आय ः फ्रान्स, सेनेगल, प्लेऑफ २ मधील विजेता, नॉर्वे

  • जे ः अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन

  • के ः पोर्तुगाल, प्लेऑफ १ मधील विजेता, उझबेकिस्तान, कोलंबिया

  • एल ः इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.