थायलंड आणि कंबोडिया दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. थायलंडने पुन्हा एकदा कंबोडियाच्या सीमेवर एअर स्ट्राइक केला आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवला होता. थायलंडने सीजफायरच उल्लंघन करत एअर स्ट्राइक केला. दोन्ही देशांनी परस्परांवर सीजफायरचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. कंबोडियाने आमच्यावर हल्ला केला. त्यात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले. कंबोडियावरील एअर स्ट्राइक हा त्याचं हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे असं एका थाई सैन्य अधिकाऱ्याने सांगितलं. पूर्वेकडील उबोन रत्चाथानीच्या दोन भागात हिंसाचार भडकल्याचं थाई सैन्य अधिकाऱ्याने सांगितलं. यात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला. चार जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून थायलंडने कंबोडियावर एअर स्ट्राइक केला.
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने हवाई हल्ल्याची पुष्टी केली आहे. 8 डिसेंबर 2025 च्या सकाळी जवळपास 5.04 मिनिटांनी थाई सैन्य दलाने प्रेह विहियर प्रांताच्या सेस क्षेत्रात कंबोडियाई सैनिकांवर हल्ला केला. स्टेटमेंटनुसार, कंबोडियाने पलटवार केला नाही. थायलंडकडून करण्यात आलेल्या अमानवीय आणि क्रूर कारवाईचा आम्ही कठोरता कठोर निषेध करतो, असं कंबोडियाने म्हटलं आहे. थायलंडकडून करण्यात आलेला हा हवाई हल्ला 26 ऑक्टोंबरला झालेल्या सीजफायरचं उल्लंघन आहे, असही कंबोडियाने म्हटलं आहे.
त्यानंतर पाच दिवस युद्ध चाललं
दोन्ही देशांमध्ये जुलै महिन्यात सीमावाद भडकला होता. त्यानंतर पाच दिवस युद्ध चाललं. त्यानंतर मलेशियाई पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थतेने युद्धविराम झाला. दोन्ही नेत्यांनी ऑक्टोंबर महिन्यात कुआलालंपुर येथे दोन्ही देशांमध्ये शांती करार घडवून आणला.
48 लोकांचा मृत्यू झालेला
जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये हिंसक झडपा झाल्या होत्या. दोन्ही शेजाऱ्यांनी परस्परांवर रॉकेट हल्ले केले होते. यात हल्ल्यात कमीत कमी 48 लोकांचा मृत्यू झालेला. जवळपास 3 लाख लोक अस्थायी काळासाठी विस्थापित झाले होते. डोनाल्ड ट्रम्प हे जगातील अनेक देशात सीजफायर घडवून आणल्याचा दावा करतात. ऑपरेशन सिंदूरवेळी आपण युद्धविराम घडवून आणल्याचा त्यांचा दावा आहे. पण भारताने हे कधीच मान्य केलेलं नाही.