केंद्राशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीच्या क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. काही लोकांकडून संघात येण्यासाठी शॉर्टकट पर्याय वापरला जातो आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण भ्रष्टाचार बीसीसीआयच्या नाकाखाली सुरु आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये या भ्रष्टाचाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.
खरं तर पुदुचेरीच्या संघात खेळायचं असेल तर त्यासाठी किमान एक वर्ष या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. अशी अटच बीसीसीआयकडून घालण्यात आली आहे. मात्र, या नियमाला आता हरताळ फासण्यात येतो आहे. स्थानिक क्रिकेट कोच आणि काही अधिकारी मिळून बाहेरील राज्यातील खेळाडूंना खोटे पत्ते आणि करारनामा उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी या खेळाडूंकडून एक ते दीड लाख रुपयांची मागणी केली जाते आहे.
IND vs SA: विराट कोहली नाही, तर 'या' खेळाडूला भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये मिळाले Impact Player चे मेडल; BCCI ने शेअर केला Videoइंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, गेल्या तीन महिन्यांत दोन हजारांहून अधिक खेळाडूंचे रजिस्ट्रेशन फॉर्म तपासण्यात आले. यात पुदुचेरीतील काही खासगी क्रिकेट अकॅडमींचे प्रशिक्षक बाहेरच्या खेळाडूंना स्थानिक खेळाडू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या खेळाडूंना खोटी रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध करू दिली जात आहे. ही प्रमाणपत्र मिळताच त्यांना पुदुचेरीच्या संघात प्रवेश मिळतो आहे.
ऐकावंच लागेल! Virat Kohli ने मान्य केल्या BCCI च्या अटी-शर्ती; वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी घेतला मोठा निर्णय, रोहित शर्माही...धक्कादायक बाब म्हणजे १७ स्थानिक खेळाडूंनी एकाच आधार कार्डवरील रहिवासी पत्ता वापरला आहे. ज्यावेळी याठिकाणी जात तपासणी करण्यात आली, त्यावेळी या खेळाडूंना भाडं न दिल्याने काही महिन्यांपूर्वी घराबाहेर काढण्यात आलं, अशी घरमालकाने दिली. या भ्रष्टाचाराचा फटका पुदुचेरीत खऱ्या स्थानिक खेळाडूंना बसतो आहे. त्यांच्यासाठीच्या संधी कमी होत आहेत.