आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मालाड, ता. ९ (बातमीदार) ः मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी अशा डझनभराहून अधिक इन्स्टाग्राम खात्यांची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी कलम १९६, ३५२ आणि ६६(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाविरुद्धही आक्षेपार्ह वापर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.