आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामाती 12 वा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे गुजराच टायटन्सचा होम ग्राउंड अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला घरच्या मैदानात बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात किती धावा करण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुजरात आणि हैदराबादची या मोसमात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्सने घरच्या मैदानातील सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर सनरायझर्स हैदराबादनेही गेल्या सामन्यातील 11 खेळाडूंसोबतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद आणि गुजरातच्या खात्यात 11 सामन्यानंतर प्रत्येकी 14 गुण आहेत. हैदराबाद नेट रनरेट चांगला असल्याने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर गुजरात तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करुन प्लेऑफसाठी आवश्यक असलेल्या 16 गुणांपर्यंत मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गुजरातचा ओपनर साई सुदर्शन याने आतापर्यंत 19 व्या मोसमात एकूण 4 आणि सलग 2 अर्धशतक झळकावले आहेत. साई सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे साई आता घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी हॅट्रिक पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कॅप्टन शुबमन गिल याच्याकडूनही चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. अशात शुबमन-साई सलामी जोडी गुजरातला कशी सुरुवात मिळवून देते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज.