रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर हा चीजी बेल पेपर टोस्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रंगीबेरंगी शिमला मिरची, तिखट-चटपटीत मसाले आणि भरपूर वितळलेलं चीज यामुळे प्रत्येक एकदम टेस्टी लागतो. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, चीजने भरलेला हा टोस्ट सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे लगेच लिहून घ्या कमी वेळात होणारी टेस्टी रेसिपी.
साहित्यरंगीत ढोबळी मिरची (बारीक चिरलेली)
कांदा
लसूण
हिरवी मिरची
कोथिंबीर
मीठ
काळी मिरी पावडर
चिली फ्लेक्स
ओरेगॅनो
पाप्रिका
पेरी-पेरी मसाला
मोझरेला चीज
चेडर चीज
बटर
ब्रेड
- कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चॉपरमध्ये बारीक करून घ्या.
- हे मिश्रण चिरलेल्या ढोबळी मिरचीत मिसळा. त्यात मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, पाप्रिका आणि पेरी-पेरी मसाला घालून चांगले एकजीव करा.
- यानंतर मोझरेला आणि चेडर चीज घालून हलक्या हाताने मिसळा. हे चीज नसतील तरी तुम्ही साधं चीज वापरू शकता.
- ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावा आणि तयार मिश्रण भरपूर प्रमाणात पसरवा.
- तव्यावर किंवा टोस्टरमध्ये दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.