नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पात त्या दृष्टीने आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीवर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली. राजेश एक्सपोर्टच्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सरकार खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले. रायगडच्या पालकमंत्र्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. यासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्रिस्तरावर अंतिम निर्णय होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया’ आघाडीमध्ये गेल्याने पराभव होतो असा विश्वास निर्माण झाल्यामुळे काही लोक आघाडीच्या बैठकीपासून दूर राहिले. पराभवाची भीती आणि अंतर्गत मतभेदामुळे काही नेते अस्वस्थ असल्याची टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये भविष्यात शिवसेना पक्ष कसा वाढवायचा, यावर चर्चा झाली, असे शिंदे म्हणाले.
Mahabaleshwar Khed Bridge: सह्याद्रीत उभा राहिला ‘मिनी सी-लिंक’! महाबळेश्वर-खेड जोडणारा भव्य पूल वाहतुकीसाठी सज्ज, प्रवास होणार सुसाट, कधी खुला होणार? ‘इंडिया’ आघाडी गलितगात्रविरोधकांचे नेतृत्व आणि त्यांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत इंडिया आघाडी गलितगात्र झाल्याची टीका शिंदे यांनी केली. विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे राजकारण सुरु आहे. मात्र आगामी काळात मोदी यांचे नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विकासाचा अजेंडा नसल्यामुळे विरोधक मोदी यांना लक्ष्य करत आहेत. देशात असताना आणि देशाबाहेर गेल्यावर एक नेता पंतप्रधानांची बदनामी करतो. ही कसली देशभक्ती आहे. शरद पवार तसेच ममता बॅनर्जी या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असे ते म्हणाले.