डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा June 09, 2026 12:13 PM

विरार : विरार तालुक्यातील मांडवी परिसरातील काशीद कोपर येथील कुलस्वाई माता मंदिराजवळील डोंगराळ भागात एका तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह (Virar Crime News) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात फोटोशूट करत असलेल्या तरुणाच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या झूममुळे (Virar Crime News) हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा या डोंगराळ भागात कुणी जात नसल्याने मृतदेह कित्येक दिवस तेथेच लटकलेल्या अवस्थेतच असता. सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्ष पाटील (वय २५) हा तरुण परिसरात छायाचित्रण करत असताना त्याने डोंगराळ भागाकडे मोबाईल झूम करून पाहिले. त्यावेळी एका झाडाला व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तत्काळ मांडवी पोलिसांना माहिती दिली. (Virar Crime News)

घटनास्थळी पोलीस व ग्रामस्थ दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने गमछ्याच्या सहाय्याने गळफास (Virar Crime News) घेतल्याचे आढळले. अंगझडतीदरम्यान मिळालेल्या आधार कार्डावरून मृताची ओळख लालमोहन पारस चौहान (वय ३४, मूळ उत्तर प्रदेश) अशी पटली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत.(Virar Crime News)

Virar Crime News : कॅमेरा झूम केला अन् झाडाला लटकलेल्या अवस्थेत...

सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्ष पाटील (वय २५) हा तरुण परिसरात फोटो काढत असताना त्याने डोंगराळ भागाकडे मोबाईल झूम (Virar Crime News) करून पाहिला. त्यावेळी एका झाडाला व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तत्काळ मांडवी पोलिसांना माहिती दिली.विरार तालुक्यातील मांडवी परिसरातील काशीद कोपर येथील कुलस्वाई माता मंदिराजवळील डोंगराळ भागात एका ३४ वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.(Virar Crime News)

विशेष म्हणजे, मंदिर परिसरात फोटोशूट करत असलेल्या एका तरुणाला मोबाईल कॅमेऱ्याच्या झूमद्वारे हा मृतदेह दिसला. त्यानंतर तात्काळ मांडवी पोलिसांना माहिती देण्यात आली. मृताची ओळख लालमोहन पारस चौहान (वय ३४, मूळ उत्तर प्रदेश) अशी झाली असून, प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मांडवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

आणखी वाचा - Virar Crime News: दोन वर्षांपासून प्रेमसंबंध; लग्नाला नकार, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईलाही संपवलं, त्यानंतर स्वतःवर वार केले अन्...पोलिसांनी दिली घटनेची माहिती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.