मराठी On Bacchu Kadu: देवाभाऊंचं (देवेंद्र फडणवीसांचं) प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे (मराठी) मुख्यमंत्री व्हावे. 15 ते 20 दिवसांत आम्ही विदर्भात अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. चार दिवसांत मी विदर्भामध्ये 20 सभा केलेल्या आहे. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल, असं विधान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं होतं. तसेच शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू…स्वबळावर की नाही, ते ठरले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचंच आहे, असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडूंच्या या विधानावर आता स्वत: एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील. तुम्ही त्यांचं नाव पत्रिकेवर लिहा की नका लिहू एकनाथ शिंदे लोकांच्या मनातले नेते आहेत, असंही बच्चू कडूंनी सांगितले. शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील 20 राज्यांच्या राज्यप्रमुखांची बैठक काल नवी दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडू यांच्या विधानावर विचारले असता हसत हसत प्रतिक्रिया दिली. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं बच्चू कडू म्हणाल्याची माहिती त्यांना दिली. यावर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले, याची मी माहिती घेतो, त्यानंतर बोलतो, असं हसत हसत एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं सूचक मौन पाहून विविध चर्चांना उधाण आले आहे. (मराठी On Bacchu Kadu)
आमदार बच्चू कडू यांच्या या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. शेतकऱ्यांच्या बाबत त्यांची मागणी होती. 50 हजार सानुग्रह अनुदान दिलं, त्यांनी 1 लाखांची मागणी केली. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. मात्र ही मागणी स्वाभाविक मागणी आहे. माझीही मागणी आहे की, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस व्हावे, तशीच आमची मागणी असते. बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होत्या त्या केल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. आता बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते यावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.