‘ऑब्सेशन’ या हॉलिवूड हॉरर थ्रिलर चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. परदेशात या चित्रपटाची छप्परफाड कमाई तर होतच आहे, पण भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.
आजही या चित्रपटाला सर्वोत्तम हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर मानलं जातं. या चित्रपटाचं नाव आहे ‘कृष्णा कॉटेज’. सोहैल खान, ईशा कोपिकर, अनिता हसनंदानी आणि रती अग्निहोत्री यांच्या यात भूमिका होत्या. ‘कृष्णा कॉटेज’ची कथा ही ‘ऑब्सेशन’पेक्षाही अधिक भयानक आणि घाबरगुंडी उडवणारी आहे.
बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपट चांगल्या बनवल्या जात नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र ‘कृष्णा कॉटेज’ या चित्रपटाला टीव्हीवर प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. बॉलिवूडमधल्या क्लासिक हॉरर चित्रपटांचा विषय निघाला की आजही या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून होतो.