Actor Manjari Fadnis: फेमस फिल्म, टीव्ही अॅक्ट्रेस, मॉडेल अन् सिंगर मंजरी फडणीस (Manjari Fadnis) सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीला अश्रु (Entertainment) अनावर झाले आहेत. ती प्रचंड रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचे शब्द ऐकून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. खरंतर या व्हिडीओत अभिनेत्री बिल्डिंगमधील कुत्रा, माइकीच्या निर्घृण हत्येची माहिती देत आहे. या घटनेतून अभिनेत्रीला प्रचंड त्रास झाला असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे. व्हिडीओत अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? पाहूयात.
मंजरी फडणीसच्या घरी सध्या शोकाचे वातावरण आहे. अभिनेत्रीने आपल्या व्हिडीओत म्हटलं की, 'हा मी व्हिडीओ कदाचित कधीच बनवला नसता, पण हा व्हिडीओ तयार करणं खूप गरजेचं आहे', असं म्हणत अभिनेत्रीनं आपल्या व्हिडीओची सुरुवात केली. 'आमच्याकडे माइकी नावाचा एक कुत्रा होता. तो 2019 -20 पासून आमच्या सोसायटीचा एक भाग होता'.
View this post on Instagram
'तो अतिशय प्रेमळ कुत्रा होता. माइकी अचानक गायब झाला. आम्ही वेड्यासारखे त्याला शोधत होतो. कुत्रा हरवल्यानंतर आम्ही त्याचे पोस्टर्स लावले. आम्ही सर्व गार्ड्सशी बोललो. वेड्यासारखा त्याचा शोध घेतला. आम्हाला जाणून घ्यायचे होते, माइकी नेमका कुठे आणि का गेला होता? अखेरीस, इथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपला गुन्हा कबूल केला', असं अभिनेत्री म्हणाली.
'माइकी आमच्या बिल्डिंगच्या तळघरात शांतपणे झोपला होता. त्याच्या डोक्यात मोठ्या काठीने किंवा सळीने प्रहार करण्यात आला. त्या व्यक्तीने त्याचा पाठलाग करत माइकीला मारले. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. त्याला उलट्या होऊ लागल्या. जवळजवळ त्याचे प्राण गेले होते. त्या लोकांनी त्याला एका पोत्यात घालून मागच्या बाजूला असलेल्या खाडी एरियात फेकून दिले', असं अभिनेत्री रडत रडत म्हणाली.
'तो अर्धवट जिवंत होता. तो वाचला असता की नाही, हे मला माहित नाही. आम्ही त्याचा मृतदेह शोधला', अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर सुप्रीम कोर्टने अॅक्शन घेतली पाहिजे, अशी मागणीही यावेळी तिनं केली. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आमच्या माइकीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आम्ही त्याच्यासाठी लढू. कोणत्याही कुत्र्यासोबत असे कधीही घडू नये लोकांनी प्राण्यांना इजा करण्याची भीती बाळगली पाहिजे', असं अभिनेत्री म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या: