Tulapur Rave Party On American Film: पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरील तुळापूर भागातील फार्महाऊसमध्ये झालेल्या कथित हाय प्रोफाईल 'रेव्ह पार्टी'वर पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकलेला. 'प्रोजेक्ट X' असे नाव देऊन आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत अमली पदार्थांचा वापर करण्यात आल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या या पार्टी पुणे पोलिसांनी दोन मुख्य आयोजकांना ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून तुळापूर परिसरातील फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीमागची थीम 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रोजेक्ट X' चित्रपटाच्या धरतीवर होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीत वापरलेले एक पोस्टर याचा चित्रपटातील दाखवलेल्या पार्टीसारखेच आहे. त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या पार्टीसारखाच तुळापूरच्या पार्टीत सर्व काही उपलब्ध होते का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रोजेक्ट एक्स चित्रपटात वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली सर्रास होणारे अंमली पदार्थाचे सेवन, दारू, हुक्का सेवन तसेच सोशल मीडियाच्या एका पोस्टर वरून शेकडो लोक एकत्र येऊन पार्टी तर केलेला धिंगाणा दाखवण्यात आला आहे.तुळापूर येथील रेव्ह पार्टीचे ही असेच काहीसे झाले असल्याचा संशय आहे.तुळापूर येथील पार्टीचे नाव 'प्रोजेक्ट X ' होते.या पार्टीचे प्रमोशन आणि शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आलेले लोकेशन यामुळे या चित्रपटाची थीम आणि तुळापूरचे घटना यांची तुलना केली जात आहे.
प्रोजेक्ट एक्स चित्रपटात स्विमिंग पूल व त्यात विविध टॉईजसोबत खेळणारे तरुण-तरुणी दाखवण्यात आले आहेत. तुळापूर पार्टीत असे टॉइज उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे.
पुण्यातील तुळापूर परिसरातील एका आलिशान रिसॉर्ट मध्ये 'प्रोजेक्ट एक्स ' नावाखाली कथेत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टी पहाटेपर्यंत रंगली. मद्याच्या नशेत विभाग झालेले तरुण तरुणी, कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज, अनेक अंमली पदार्थांचे सेवन, परभणीचे मुदत संपल्यानंतरही सुरू झालेला धिंगाणा यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे अडीचच्या सुमारास या फार्म हाऊस वर छापा टाकत पार्टी उधळून लावली. रविवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सात आयोजकांसह 78 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला होता का ?यासाठी वैद्यकीय चाचण्या आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम गुन्हे शाखा करत आहे.