खारघर : तळोजा फेज-दोन येथील सेक्टर २६ मधील महावितरणच्या उपकेंद्रात रविवारी (ता. ८) मध्यरात्री अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. यामध्ये विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उकाड्याच्या दिवसांत वीज गेल्यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
तळोज्यात रात्री एकच्या सुमारास उपकेंद्रातून धूर निघत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. काही वेळातच आगीने तीव्र स्वरूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरण, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यासंदर्भात महावितरणचे उपअभियंता रोहित मोरे यांच्याशी संपर्क केला असता, युद्धपातळीवर काम करून रात्री चारच्या सुमारास भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगितले.
Navi Mumbai: डेटा सेंटरसाठी २८२ कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार खारघरमध्ये तीन दिवस खेळखंडोबासेक्टर १२ मधील बी आणि जी लाइन परिसरात मागील तीन दिवसांपासून दररोज रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी आदेश भोईर म्हणाले, वीजपुरवठा बंद झाल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता समस्येचे ठोस कारण सांगण्याऐवजी तात्पुरती उपाययोजना करून वेळ मारून नेली जाते.
महावितरणवर ताण; नवीन उपकेंद्र उभारणारनवी मुंबई, पनवेल आणि उरण या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरातील वीज ग्राहकांची संख्या तब्बल ११ लाखांवर पोहोचली आहे. या वाढत्या भारामुळे महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांवर आणि रोहित्रांवर मयदिपलीकडे ताण निर्माण झाला आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, कामोठे आणि उलवे या नोड्समध्ये ६ ते १२ तास वीज खंडित होत असल्याने नागरिकांचा उद्रेक होत आहे.
महावितरणनेक्षमतेपेक्षा अधिक जोडण्या दिल्यामुळे वीज खंडित होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. राज्य विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महावितरणला नवीन वीज जोडण्या देणे बंधनकारक आहे. या नियमांनुसार, महानगर क्षेत्रात ३ दिवस, नागरी क्षेत्रात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांच्या आत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास नवीन वीज जोडणी द्यावी लागते. पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक असेल, तर ९० दिवसांची मुदत दिली जाते ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे नवीन वीज जोडण्या देण्याच्या गतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नियामक आयोगाच्या दंडनीय कारवाईपासून वाचण्यासाठी महावितरण ऑनलाइन अर्जाना त्वरित मंजुरी देऊन नवीन मीटर तर बसवते. परंतु, यामुळे वाढणाऱ्या वीज भाराला सामावून घेण्यासाठी नवीन उपकेंद्रे आणि रोहित्रांचे क्षमता वाढवण्यास असमर्थ ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. या तांत्रिक असमतोल नवी मुंबईतील वीज संकटाचे मूळ कारण ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली नवीन वीज उपकेंद्र मिळणारतळोजा: रोहिंजन येथे एक उपकेंद्र.
नेरुळः एक उपकेंद्र.
ऐरोली: दोन उपकेंद्र.
कामोठे: सेक्टर २५ मध्ये उपकेंद्र.
उलवेः उपकेंद्र आणि सेक्टर ८ मधील वीज खंडित समस्येसाठी नवीन २०० मीटरची वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे.
नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसराचा समावेश असलेल्या महावितरणच्या वाशी परिमंडळात गेल्या दशकात ग्राहकांच्या संख्येत अफाट वाढ झाली आहे.
वाढत्या तापमानामुळे वीज वापर प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षीच्या २ तुलनेत यंदा ५० टक्क्याहून अधिक वीज वापर होत आहे. यामुळे रोहित्रांवर अतिभार येत असल्यामुळे यंत्रणा ट्रिपचे प्रकार वाढले आहेत.
३ शहरी भागात सर्व वीज वाहिन्या या भूमिगत आहेत. वीज वाहिन्या एकमेकांना जोडलेल्या असून ज्या भागात जोड आहे. त्या भागात शॉर्टसर्किट होऊन वीज खंडित होत आहे. जमिनीखाली नेमकी बिघाड झालेली वाहिनी शोधून दुरुस्त करण्यात वेळ लागत असल्याने पुरवठा सुरळीत होण्यास उशिर होत आहे.
महावितरणने उपकेंद्राच्या क्षमतेनुसार वीज जोडण्या दिल्या आहेत, ४ असे स्पष्टीकरण महावितरणच्या वाशी मंडळाचे अधिक्षक अभियंते दिपक पाटील यांनी दिले.
२०१७ - २.४५ लाख (ऐरोली, कोपरखैरणे, वाशी)
२०२० - ४.३४ लाख (वाशी परिमंडळ)
२०२६ - ११ लाख