Inside Story: सूर्यकुमार यादवचा 'काटा' कोणी काढला? पडद्यामागून असा 'गेम' केला; श्रेयस नव्हे, कर्णधारपदासाठी २ नावं सुचवलेली, पण...
esakal June 09, 2026 07:45 PM

Inside story of India's T20 captaincy discussion: भारताला २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव, याच्याकडून BCCI ने कर्णधारपद काढून घेतले... एवढेच नव्हे तर सूर्याचे ट्वेंटी-२० संघातील स्थानही गेले... सूर्याचा कर्णधार म्हणून रेक़ॉर्ड चांगला असला तरी फलंदाज म्हणून त्याची कामगिरी ढासळली होती आणि हेच कारण, त्याचे संघातील स्थान जाण्यासाठी पुरेसे ठरले. पण, सूर्यकुमारला हटवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने जोर लावल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

सूर्यकुमारने लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत आणि २०२८ मध्ये आणखी एक ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा जाहीर केल्याने गौतम गंभीर नाराज झाला होता, असे CricBlogger.com च्या वृत्तात म्हटले आहे. संघातील त्याचे स्थान आणि नेतृत्वाची भूमिका ही त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर, विशेषतः आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल, असे मुख्य प्रशिक्षकाने सूर्यकुमारला सांगितले होते.

Team India : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूची अचानक माघार; BCCI च्या ट्विटने उडवली झोप

सूर्यकुमारच्या फॉर्मबाबत गंभीरने आयपीएल २०२६ दरम्यान निवड समितीकडे तक्रार केली होती. त्याचवेळी त्याने सूर्याला नुसते कर्णधारपदावरून नव्हे, तर ट्वेंटी-२० संघातूनच काढून टाकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच्या या प्रस्तावाला निवड समिती प्रमुख अजित आगरकर यानेही होकार दिला होता. सूर्याने आयपीएल २०२६ मध्ये २०.७७ च्या सरासरीने २७० धावा केल्या होत्या. २०१७ नंतर ही त्याची सर्वात कमी सरासरी ठरली.

कर्णधारपदासाठी दोन नावं...

अहवालानुसार गौतम गंभीरने कर्णधारपदासाठी संजू सॅमसन व इशान किशन, ही दोन नावं सूचवली होती. पण, आगरकरने यावेळी श्रेयस अय्यरच्या नावावर जोर दिला. गंभीरने याबाबत बीसीसीआयची चर्चा केली आणि सूर्याला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेण्याचे ठरले. नवीन कर्णधारपदासाठी गंभीर व आगरकर यांची अखेर श्रेयसच्या नावावर सहमती झाली.

Bizarre Run Out: ऋतुराज गायकवाड-प्रियांश आर्य एकाच दिशेला पळाले, यष्टिरक्षकाच्या 'बूटा'मुळे झाला कांड... नेमकं काय घडलं?

जर हा अहवाल खरा असेल, तर तो गंभीरच्या कार्यपद्धतीतील कठोरपणा दर्शवतो. कोलकाता नाईट रायडर्समधील त्यांच्या पूर्वीच्या संबंधांमुळे, मुख्य प्रशिक्षक गंभीर बऱ्याच काळापासून सूर्यकुमारच्या खूप जवळचे असल्याचे म्हटले जाते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.