वैनगंगा नदीत बोट उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुरक्षित बाहेर पडले
Webdunia Marathi June 09, 2026 08:45 PM

भंडारा येथील वैनगंगा नदीत बोट उलटल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर इतर पाच जण सुरक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भंडारा तालुक्यातील करचखेडा येथे रविवारी संध्याकाळी वैनगंगा नदीच्या काठावर झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण बुडून मरण पावले, तर इतर पाच जण पोहून किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांनी आपले प्राण वाचवले. सात जण एका खाजगी बोटीने वैनगंगा नदीच्या मधोमध असलेल्या एका बेटावर आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करून परत येत असताना बोटीचा तोल अचानक गेला आणि ती उलटली. या अचानक झालेल्या अपघातात सर्वजण पाण्यात पडले.

ALSO READ: ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे बोगस डॉक्टरकडून उपचार घेतल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. भंडारा जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार जिल्हा शोध आणि बचाव पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ALSO READ: वर्ध्यात बनावट बियाणे आणि खतांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने ४२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.