Jalgaon Bus Accident : वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवले पाहिजे, असे नेहमी सांगितले जाते. हे नियम पायदळी तुडवल्यामुळेच अनेकदा अपघात होतो. काही अपघात तर एवढे भीषण असतात की त्यात अख्खं कुटुंबच संपून जातं. सध्या जळगावातही असाच एक भीषण आणि हादवरून टाकणारा अपघात घडला आहे. या अपघातात. जळगावच्या अमळनेरनजीक मंगळूर गावाजवळ कार दुचाकी आणि बस अशा तीन वाहनाच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर अपघात नेमका कसा झाला? याबाबत माहिती समोर आली आहे. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
तर मोठा अनर्थ घडला असताजळगावच्या अमळने येथील मंगळूर गावाजवळ कार दुचाकी आणि बस अशा तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. कार धडकल्यानंतर बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असे म्हटले जात आहे.
कारचालक डुलक्या घेऊ लागला मीच त्याला…या घटनेत अपघातग्रस्त बसवरील चालकाने अपघाताचा थरार सांगितला आहे. अपघात झाला त्यावेळी नेमकं का घडलं, याचीही बसचालकाने माहिती दिली आहे. कारचालक झोपेत असल्यामुळे अपघात झाला, असे या बसचालकाने म्हटले आहे. कारवरील चालक झोपेत डुलक्या देत होता, त्याला मी हॉर्न दिले. लाईट अप्पर डिपर केले. यात त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवलं आणि नंतर बसवर येऊन आदळला, अशी माहिती बसचालकाने दिले.
राज्यभरातून हळहळ व्यक्तकार बसवर धडकल्यानंतर मी वेळीच नियंत्रण मिळवलं अन्यथा बस मध्ये 35 प्रवासी होते मोठी दुर्घटना घडली असती, असेही बसचालकाने सांगितले. दरम्यान या दुर्दैवी अपघातानंतर राज्यभरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली जात आहे.