Maharashtra IAS Transfer : राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 4 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS Officers) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांची बदली मुंबईमध्ये करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत मंगळवारी हा अधिकृत बदली आदेश जारी करण्यात आला आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे:
1. डॉ. माधवी खोडे-चवरे (IAS:RR:2007)
पूर्वीचे पद : अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर.
नवीन पद : सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
2. सुनील महिंद्रकर (IAS:SCS:2015)
नवीन नियुक्ती : अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक (Additional Controller of Stamp), मुंबई.
3. अनिता मेश्राम (IAS:SCS:2015)
पूर्वीचे पद : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद, अकोला.
नवीन पद : आयुक्त, मनरेगा (MGNREGS), नागपूर.
4. आदित्य जिवणे (IAS:RR:2021)
पूर्वीचे पद : संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Joint MD), महावितरण (MAHADISCOM), छत्रपती संभाजीनगर.
नवीन पद : महानगरपालिका आयुक्त, जळगाव महानगरपालिका, जळगाव.
शासनाच्या या नवीन आदेशानुसार, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव महानगरपालिकेला आता आदित्य जिवणे यांच्या रूपाने नवीन आयुक्त लाभले आहेत, तर डॉ. माधवी खोडे-चवरे आता मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव पदाची धुरा सांभाळणार आहेत.
ही बातमी वाचा: