India A vs Sri Lanka A thrilling match report : भारत अ संघाने तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका अ संघावर रोमहर्षक विजय मिळवला. २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका विजयपथावर होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचे ( Ruturaj Gaikwad Century) शतक व्यर्थ जातेय की काय, ही भीती नाहीशी झाली. भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) हा सामना पाहण्यासाठी डांबुला येथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली.
वैभव सूर्यवंशी (१४) व प्रभसिमरन सिंग ( २) यांना सलामीला आलेल्या अपयशानंतर भारत अ संघाने तिरंगी मालिकेच्या पहिल्या वन डे सामन्यात ६ बाद २७७ धावांपर्यंत मजल मारली. प्रियांश आर्य व ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करून श्रीलंका अ संघाला प्रत्युत्तर दिले. पण, प्रियांश ( ३२) दुर्दैवी रन आऊट झाला. मात्र, ऋतुराज व कर्णधार तिलक वर्मा, ही जोडी मैदानावर उभी राहिली. दोघांनी १५० धावांची भागीदारी केली.
Bizarre Run Out: ऋतुराज गायकवाड-प्रियांश आर्य एकाच दिशेला पळाले, यष्टिरक्षकाच्या 'बूटा'मुळे झाला कांड... नेमकं काय घडलं?ऋतुराजने लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचे २१ वे शतक पूर्ण करताना ११४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. तिलकने ६० धावा केल्या, तर आयुष बडोनी ( २४) व सूयांश शेडगे ( २६) यांनी चांगले योगदान दिले. श्रीलंकेच्या मोहमद शिराजने दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला निरोशान डिकवेला व अविष्का फर्नांडो यांनी ९३ धावांची सलामी देत, दमदार सुरूवात करून दिली. डिकवेला ( ४७) व फर्नांडो ( ४५) यांना आयुष बडोनीने माघारी पाठवले.
त्यानंतर आलेला नुवानिंदू फर्नांडो ( ८) अपयशी ठरला, परंतु सदीरा समराविक्रमा व कर्णधार सहान अराछिगे, ही जोडी मैदानावर उभी राहिली. त्यांची ७८ धावांची भागीदारी पदार्पणवीर अनुकूल रॉयने ( १०-१-४९-२) तोडली. सदीरा ४६ धावांवर बाद झाल्यानंतर रॉयने रविंदू फर्नांडोलाही ( १) माघारी पाठवले. विपराज निगमने डावातील दुसरी विकेट घेताना चमिका करुणारत्नेला ( ९) स्वस्तात माघारी पाठवले. पण, सहान मैदानावर उभा राहिला आणि १६ चेंडूंत १६ धावा असा सामना जवळ आणला.
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अन् Mumbai Indians यांच्या नेमकं काय सुरू आहे? जाणून घ्या Inside Story, सूर्या टीमसोबत राहणार का?वनूजा सहान ( २३) व विजयकांत वियास्कांथ ( ५) हे ४९ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर माघारी परतल्याने श्रीलंकेच्या हातून सामना निसटला. त्याच षटकात अर्शद खानने मोहमद शिराजची विकेट मिळवून श्रीलंकेचा डाव २६९ धावांवर गुंडाळला आणि भारताचा ८ धावांनी विजय पक्का केला.