महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चां
समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय
राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना संधी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रिपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा हा प्रस्ताव मान्य न केल्याने अखेर राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभा खासदारकीची संधी देण्यात आली. राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची बिनविरोध निवड झाली.
Laxman Hake: लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, रोख नेमका कुणाकडे? राजकीय वर्तुळात खळबळमात्र, आपल्याला संधी न मिळाल्याने छगन भुजबळांची नाराजी उघड झाली. जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना लागू तोच मलाही मिळायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. आता समीर भुजबळ यांनी देखील राज्यसभा आणि मंत्रिपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांच्यानंतर पुतण्या समीर भुजबळ यांनी देखील राज्यसभा आणि मंत्रिपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिमंडळ फेरबदल होईल, त्यावेळी मला संधी मिळेल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
राज्यसभेवरून भुजबळांची उघड नाराजी; भुजबळांचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला? VIDEOइतकेच नाही तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भाजपनं तसा शब्द दिला असल्याचं ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रिपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यांच्याऐवजी राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने राज्यसभा खासदारकीची संधी दिली. राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर या सर्व घडामोडीवर समीर भुजबळ यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे.
मी नाराज नाही, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. परंतु मंत्रिपदाच्या शपथेसाठी वेळ कमी होता त्यामुळे शपथविधी पार पडला नाही. भाजपकडून शब्द देण्यात आलाय. ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिमंडळ फेरबदल होईल त्यावेळी मला नक्की संधी मिळेल, असे म्हणत राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीतील इनसाईड स्टोरी समीर भुजबळ यांनी सांगितली.
राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेल्या राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणले. त्यामुळे समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ आग्रही होते. मात्र, त्यांची मागणी सध्यातरी वेटींगवर असल्याचं दिसून येतंय.