साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या हजारो भाविकांच्या श्रद्धेशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील काही खासगी दुकानांमध्ये प्रसाद म्हणून निकृष्ट दर्जाचे, बुरशी लागलेले आणि कडक झालेले पेढे विकले जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
साम टीव्हीच्या रिपोर्टनुसार, या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या अनेक पेढ्यांच्या डब्यांवर उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम मुदत किंवा ते नेमके कुठे तयार करण्यात आले याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे श्रद्धेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
Shirdi Railway Station: साईभक्तांसाठी मोठी खुशखबर! कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट हाेणार, ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरीनिकृष्ट दर्जाच्या प्रसादामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणात शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडूनही करण्यात येत आहे. एखाद्या भाविकाच्या जिवावर बेतल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे.
Pune Belasar Toll: बेलसर टोलनाक्यावर संतापाचा उद्रेक! ‘स्थानिकांकडून टोल वसुली बंद करा’, सर्वपक्षीयांचे आंदोलनश्रद्धेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट पदार्थांची विक्री होत असल्यास त्याचा परिणाम केवळ भाविकांच्या आरोग्यावरच नव्हे, तर साईनगरीच्या प्रतिमेवरही होऊ शकतो. त्यामुळे संबंधित दुकानांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.