राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करत असल्याचे समोर आले आहे. याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास आघाडीतील पक्षांना बसला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तब्बल 20 नगरसेवकांसह अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडारआज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. वरळी गावातील ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच आज रायगडच्या कर्जतमधील ठाकरे गटाच्या 20 नगरसेवकांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी बोलताना सूर्यकांत कोळी यांनी म्हटले की, वरळी कोळीवाड्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी 40 वर्षे पक्षाचं काम केलं पण मला उमेदवारी दिली नाही. मी वरळी गावांतील प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रवेश केलेला आहे.
एकनाथ शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांचे स्वागतया पक्षप्रवेशानंतर बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सर्व ठिकाणाहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. काही नसताना देखील ज्या विश्वासानं ते शिवसेनेतं येत आहेत, सगळ्यांना चालना देण्याचं काम मी करेन. पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करत आहे. पंतप्रधान मोदी 12 वर्षे सातत्यानं काम करत आहेत. देशाला यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम आपल्या नरेंद्र मोदींनी केलेलं आहे.
वेगाने विकास होत आहेपुढे बोलताना शिंदे यांनी म्हटले की, शिवसेना एनडीएचा प्रमुख घटकपक्ष म्हणून आपण काम करत आहोत. मोदीसाहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मोदी साहेबांनी देशाला शिखरावर पोहोचवण्याचं काम केल आहे. विकास सध्या वेगांने होत असल्याचं पहायला मिळतं आहे. तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.