ICC ची मोठी घोषणा! महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 हिंदुस्थानात खेळवली जाणार
Marathi September 03, 2026 12:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC ने काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा हादरा देत महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद काढून घेतलं होतं. त्यामुळे आता पहिली महिला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्याची संधी कोणत्या देशाला मिळणार? याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या पहिली महिला चॅम्पियन्स ट्रॉफी हिंदुस्थानात खेळवली जाणार असून 6 संघांमध्ये तुंबळ लढाई पाहायला मिळणार आहे.

ICC ने अधिकृतरित्या हिंदुस्थानच्या नावाची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी 2027 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत चॅम्पिनन्स ट्रॉफीचा थरारा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दोन स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सर्व सामने पार पडतील. या स्पर्धेत हिंदुस्थानसह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ विजेतेपदासाठी एकमेकांना कडवी झुंज देताना पाहायला मिळतील. श्रीलंकेकडून यजमानपद काढून घेतल्यानंतर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये यजमानपदासाठी चुरस पाहायला मिळाली. परंतू अखेर हिंदुस्थानने बाजी मारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.