Arvind Kejriwal : मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. या प्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.