चंद्र प्रकाश बनला KBC 16 चा पहिला करोडपती; पण 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देता येईना? काय होता प्रश्न, काय आहे उत्तर?
Saam TV September 27, 2024 06:45 AM

अमिताभ बच्चन हे निवेदक असलेल्या कौन बनेगा करोडपती हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात आवडता आणि सर्वात जास्तवेळा पाहिला जाणारा रिॲलिटी गेम शो आहे. या शोचा 16 वे सत्र सुरू आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या यंदाच्या पहिल्या करोडपतीने 32 व्या भागात प्रवेश केलाय. काश्मीरचा राहणारा 22 वर्षीय चंद्र प्रकाश या सीझनचा पहिला करोडपती बनलाय. चंद्र प्रकाश 7 कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठी खेळ खेळत होता. पण प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकला नाही.

7 कोटींच्या प्रश्नाचे खरे उत्तर काय होते माहित आहे का? असं म्हणतात की, मनात ध्यास असेल तर यशाचा मार्ग सुकर होत असतो. 22 वर्षीय चंद्र प्रकाश देखील अनेक स्वप्ने घेऊन 'कौन बनेगा करोडपती सीझन 16' मध्ये पोहोचला. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्या चंद्रप्रकाश यांनी हे सिद्ध करून दाखवले की ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जी हरवता येत नाही.

7 कोटींचा तो प्रश्न काय होता?

करोडपती झाल्यानंतर चंद्र प्रकाशला 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचा सामना करावा लागला. बिग बींनी त्यांना 7 कोटी रुपयांचा 16 वा प्रश्न विचारला.

1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांना जन्मलेले पहिले रेकॉर्ड केलेले मूल कोण होते?

पर्याय होते-

A: व्हर्जिनिया डेअर

ब: व्हर्जिनिया हॉल

सी: व्हर्जिनिया कॉफी

डी: व्हर्जिनिया सिंक

प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे

या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे व्हर्जिनिया डेअर हा पर्याय आहे. मात्र चंद्रप्रकाश या प्रश्नात अडकले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.