आकुर्डीतील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान
esakal September 27, 2024 08:45 AM

पिंपरी, ता. २६ ः लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने हरीशकुमार कौशल्यादेवी बालकिशन भांगडीया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. २९ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. १२५ जणांची साखर व हिमोग्लोबिन तपासणी केली. या शिबिराच्या उद्घाटन लायन्स क्लबचे झोन अध्यक्ष मुख्य आयोजक अनिल भांगडिया, रिजनचे अध्यक्ष शैलेजा सांगळे, उद्योजक नामदेव पोटे, राष्ट्रतेज मंडळाचे नाना काळभोर, संजय डेंबरे, प्रकाश गादीया, स्वप्नील शेठ, लायन्स क्लब आकुर्डीचे अध्यक्ष बाबुराव सागावकर, सचिव डॉ. विनायक बिरादार, खजिनदार नीलेश चोपडे आदी उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.