यूट्यूबर रणवीर अलाहबादियाचे दोन यूट्यूब चॅनेल हॅक, सर्व व्हिडीओ आणि कंटेंट डिलीट; कोट्यवधींचं नुकसान
जयदीप मेढे September 27, 2024 11:43 AM

Ranveer Allahbadia Youtube Channel Hacked : प्रसिद्ध रणवीर अल्लाबदिया सायबर हल्याच्या बळी ठरला आहे. हॅकर्सनी त्याचे यूट्यूब चॅनल बीअर बायसेप्स (Ranveer Allahbadia Beerbiceps) हॅक केल्याची माहिती आहे. हॅकर्सने रणवीरचे दोन यूट्यूब चॅनेल्स हॅक केले आहेत. इतकंच नाही तर हॅकर्स त्याच्या चॅनलवरील सर्व कंटेंट डिलीट केला आहे.

यूट्यूबर रणवीर अलाहबादियाचे दोन यूट्यूब चॅनल हॅक

रणवीर अल्लाबदियाचे यूट्यूब चॅनल हॅक करुन त्याचे सर्व व्हिडीओ डिलीट करण्यात आले असून यूट्यूब चॅनलचं नावही बदलण्यात आलं आहे. यूट्यूब चॅनलचं नाव बदलण्यासोबतच, हॅकर्सनी रणवीर अल्लाबदियाच्या दोन्ही चॅनेलवरील सर्व मुलाखती आणि पॉडकास्ट हटवले आहेत. चॅनलवरील सर्व कंटेट डिलीट करुन हॅकर्सने त्याऐवजी एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जुन्या मुलाखती अपलोड केल्या आहे.

सर्व व्हिडीओ आणि कंटेंट डिलीट

सध्या सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच हॅकर्सने सुप्रीय कोर्टाचं यूट्यूब चॅनेल हॅक केलं होतं. आथा हॅकर्सनी रणवीरने यूट्यूब चॅनल BeerBiceps YouTube चॅनल हॅक करून त्याचे सर्व व्हिडिओ हटवले आहेत. या घटनेमुळे रणवीर अलाहबादीयाचं मोठं नुकसान झालं आहे.

यूट्यूब चॅनलचं नावही बदललं

हॅकर्सनी रणवीर अलाहाबादियाच्या बीअर बायसेप्स या यूट्यूब चॅनलचे नाव बदलून Elon.trump.tesla_live2024 असं केलं आहे. याशिवाय, त्याच्या वैयक्तिक यूट्यूब चॅनेलचे नाव बदलून Tesla.event.trump_2024 असं करण्यात आलं आहे. रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनलवर फिटनेस, प्रेरणादायी विषयांवर पॉडकास्ट आणि मुलाखती अपलोड करायचा.

रणवीरने सुरु केला पॉडकास्टच्या ट्रेंडला

रणवीर अल्लाबदिया हे सोशल मीडियाच्या जगात एक मोठं नाव आहे. पॉडकास्टच्या ट्रेंडला रणवीर अलाहाबादियाने खऱ्या अर्थाने पुढे आणलं आहे. मात्र सध्या त्याला सायबर हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर 2023 पर्यंत रणवीर अल्लाबदियाच्या चॅनेलवर एकूण 13.52 मिलियन सब्सक्राइबर होते. यापैकी 6.83 सब्सक्राइबर त्याच्या वैयक्तिक चॅनेलवर आणि 6.69 सब्सक्राइबर बेअरबायसेप्स चॅनलवर होते.

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.