'तारक मेहता...' फेम सोनूच्या अडचणीत वाढ, निर्मात्यांनी पाठवली कायदेशीर नोटीस; नुकसानीची भरपाई देण्याची मागणी
नामदेव जगताप September 27, 2024 03:13 PM

TMKOC Sent Notice To Palak Sindhwani : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील निर्माते आणि कलाकार याच्यात गेल्या काही काळापासून अनेक वाद समोर आले आहेत. तारक मेहता फेम गुरुचरण सिंह उर्फ सोढी याने मालिकेतून हाकलल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. सोढीची पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिलाही अशाच प्रकारे शोमधून बाहेर काढण्यात आल्या त्याने सांगितलं होतं. आता आणखी एका कलाकारासोबत निर्मात्यांचा वाद समोर आला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांनी सोनू उर्फ पलक सिंधवानी हिच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. तिला नोटीस पाठवत नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

'तारक मेहता...' मधील सोनूच्या अडचणीत वाढ

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचं प्रोडक्शन हाऊस नीला फिल्म प्रॉडक्शनने सोनूची भूमिका साकरणाऱ्या पलक सिंधवानीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पलकवर शोच्या निर्मात्यांनी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. पलक सिंधवानीने विशेष कलाकारांच्या कराराच्या अनेक नियमांचं पालन केलेलं नाही, ज्यामुळे शो आणि प्रॉडक्शन कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

अभिनेत्री पलक सिंधवानी हिने निर्मात्यांची परवानगी न घेता कराराच्या विरोधात जाऊन एंडोर्समेंट आणि थर्ड पार्टी प्रोजेक्ट संबंधित कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अनेक तोंडी आणि लेखी इशारे देऊनही पलकने हे सर्व सुरूच ठेवलं. यामुळे शोमधील तिची भूमिका आणि शो दोन्हीचं नुकसान झालं असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नीला फिल्म प्रॉडक्शनने पलक सिंधवानीवर कायदेशीर कारवाई करत तिला नोटीस पाठवली आहे.

निर्मात्यांची अभिनेत्रीकडून नुकसानभरपाईची मागणी

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर पलक सिंधवानीनेही प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर पलक सिंधवानी शो सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शोच्या निर्मात्यांनी नोटीस पाठवण्याची बातमी चुकीची असल्याचं पलकने सांगितलं आहे. प्रॉडक्शन हाऊसने पलकचे आरोप फेटाळले आहेत आणि या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची आणि तिच्या आणि शोच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' अनेकदा वादात 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो असून तो गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान, हा शो यापूर्वीही अनेकदा वादात सापडला आहे. निर्मात्यांशी मतभेद झाल्यामुळे अनेक कलाकारांनी दिग्दर्शक असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आणि शोचा निरोप घेतला. जेनिफर मिस्त्री आणि गुरुचरण सिंहचा आरोप आहे की, निर्मात्यांनी त्यांना न सांगता अचानक शोमधून काढून टाकलं.

Mumbai Crime News : बांगलादेशी अडल्ड स्टारचं भारतात अवैधरीत्या वास्तव्य, उल्हासनगरमधून बांगलादेशी कुटुंबाला अटक

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.