Kamindu Mendis टेस्ट क्रिकेटचा नवा किंग, शतकासह डॉन ब्रॅडमॅन याच्या महारेकॉर्डची बरोबरी, रुटचा विक्रम मोडीत
GH News September 27, 2024 05:15 PM

न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या युवा फलंदाज कामिंदु मेंडीस याने इतिहास रचला आहे. कामिंदुने गॉल कसोटीतील दुसऱ्या दिवशी शतकी खेळी केली. कामिंदुने या शतकी खेळीसह दिग्गज क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच कामिंदुच्या या शतकी खेळीनंतर श्रीलंका आणखी मजूबूत स्थितीत पोहचली आहे.

कामिंदुने पहिल्या दिवशी 56 चेंडूत 51 धावा करत पदार्पणापासून सलग आठव्या डावात 50+ धावा करण्याचा विश्व विक्रम केला. कामिंदुने यासह पाकिस्तानच्या सउद शकील याच्या पदार्पणापासून सलग 7 वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर कामिंदुने दुसऱ्या दिवशी तीच लय कायम ठेवली आणि शतक पूर्ण केलं. कामिंदुने 147 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 1 षटकारसह हे शतक केलं. कामिंदुच्या कसोटी कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. कामिंदुने अवघ्या 13 व्या डावात हा कारनामा केला. कामिंदुने यासह सर्वात कमी डावांमध्ये 5 कसोटी शतकं करत सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सर्वात कमी डावात 5 शतकं करण्याचा विक्रम विंडिजच्या एवर्टन वीक्स यांच्या नावावर आहे. वीक्सने 10 डावांमध्ये 5 शतकं केली होती.

डावांनुसार वेगवान 5 कसोटी शतकं

  1. एवर्टन वीक्स – 10 डाव
  2. हर्बर्ट सटक्लिफ – 12 डाव
  3. नील हार्वे – 12 डाव
  4. डॉन ब्रॅडमॅन – 13 डाव
  5. जॉर्ज हेडली – 13 डाव
  6. कामिंदु मेंडीस – 13 डाव

जो रुटचा रेकॉर्ड उद्धवस्त

दरम्यान कामिंदुचं हे 2024 वर्षातील एकूण पाचवं शतक ठरलं. कामिंदुने यासह इंग्लंडच्या जो रुट याच्या 2024 वर्षात सर्वाधिक 4 शतकांचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. कसोटी क्रिकेटमध्ये 2024 वर्षात रुटनंतर टीम इंडियाचा शुबमन गिल, न्यूझीलंडचा केन विलियमसन आणि इंग्लंडच्या ओली पोप या तिघांनी प्रत्येकी 3-3 कसोटी शतकं केली आहेत.

कामिंदु मेंडीसचं विक्रमी शतक

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.