Latest Maharashtra News Updates : तेलंगणाच्या मंत्र्याच्या घरी ईडीची धाड
esakal September 28, 2024 12:45 AM
ED Raid Live: तेलंगणाच्या मंत्र्याच्या घरी ईडीची धाड

अंमलबजावणी संचालनालय तेलंगणाचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या निवासस्थानी कथित हवाला व्यवहार प्रकरणी छापेमारी करत आहे.

Live News Updates : निवडणूक आयोगाची आज मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अजितदादा गटाकडून अनिल पाटील आणि शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून रवींद्र पवार आणि अदिती नलावडे सहभागी झाले, तर ठाकरे गटाकडून सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. भाजपकडून आशिष शेलार यांनी या चर्चेत भाग घेतला, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Pune Metro Live: पुण्यात महाविकास आघाडीचा पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न

सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन सुरु आहे.

Badlapur Crime Live : अक्षय शिंदेच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Latur Crime: लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात

महाराष्ट्र सीमेवर वाहनधारकांकडून महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यासह अन्य एका खासगी व्यक्तीला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५) रात्री रंगेहाथ पकडले.

Dombivili Live: आरपीआय आठवले गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ह्यांचे निधन

डोंबिवली मधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि आरपीआय (आठवले गटाचे) विद्यमान डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ह्यांचे निधन झाले आहे.

Vijay Singh Rajemane Passed Away : म्हसवड येथील विजयसिंह राजेमाने यांचे निधन

म्हसवड : येथील विजयसिंह भोजराज राजेमाने (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. म्हसवड पालिकेच्या माजी नगराध्यक्षा हिंदमालादेवी राजेमाने यांचे पती व येथील फलटण एज्युकेशन शिक्षण सोसायटीच्या भय्यासाहेब राजेमाने कॉलेज कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज राजेमाने यांचे वडील होत.

Sunil Tatkare LIVE : खासदार सुनील तटकरे यांना केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने रायगडचे खासदार आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

Ajit Pawar LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर

गडहिंग्लज : जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. मसणाई मंदिराजवळच्या मैदानात सकाळी साडेअकराला हा कार्यक्रम होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या पवार यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Uddhav Thackeray LIVE : उद्धव ठाकरेंकडून आज जिल्ह्याचा आढावा, 'मातोश्री'वर बैठ

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी ते जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभाप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Siliguri Police LIVE : सिलीगुडीला परीक्षा देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना धमकावल्याप्रकरणी दोघांना अटक

पश्चिम बंगाल : सिलीगुडी पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बागडोगरा पोलिसांनी बिहारमधून सिलीगुडी येथे परीक्षा देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना धमकावल्या आणि छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रजत भट्टाचार्य आणि गिरीधारी रॉय अशी आरोपींची नावे असून ते सिलीगुडीचे रहिवासी आहेत, अशी माहिती बिस्वचंद ठाकूर, डीसीपी, सिलीगुडी पोलीस आयुक्तालय यांनी दिली.

Election Commission Team LIVE : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल

रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल झालीये. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही टीम मुंबईत आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, सहआयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस. एस. संधू यांच्या सोबत इतर अधिकारी देखील दाखल झालीयेत. उद्या टीम राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोबतच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर परवा आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. इथे क्लिक करा

RTO Employees Association LIVE : आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप मागे

मुंबई : विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत सकारात्मक संप मागे घेतल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले. आरटीओ कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता.

Kolhapur School Closed LIVE : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आज बंद, काय आहे कारण?

Latest Marathi Live Updates 27 September 2024 : अन्यायी संच मान्यता आदेश त्वरित रद्द करावा, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अघोषित बंद राहणार आहेत. तसेच विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत सकारात्मक संप मागे घेतल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले. रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल झालीये. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही टीम मुंबईत दाखल झाली आहे. राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहे. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही पावसाची शक्यता आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.