ENG vs AUS : लियाम लिविंगस्टोनचा झंझावात, ब्रूक-बेन डकेटचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियासमोर 313 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
GH News September 28, 2024 01:07 AM

इंग्लंड क्रिकेट टीमने चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 313 धावांचं आव्हान दिलं आहे. पावसामुळे 50 ऐवजी फक्त 39 षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंग्लंडने 39 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 312 धावा केल्या. इंग्लंडकडून कॅप्टन हॅरी ब्रूक आणि बेन डकेट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. तर अखेरीस लियाम लिविंगस्टोन याने तोडफोड अर्धशतकी खेळी करत फिनिशिंग टच दिला. त्यामुळे इंग्लंडला 300 पार मजल मारता आली. तर जेकब बेथल याने लिविंगस्टोन याला चांगली साथ दिली. लिविंगस्टोन आणि बेथल या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.